स्थानिक
रेखा साबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस अवॉर्ड प्रदान

0
0
9
8
4
7
येवला (प्रतिनिधी) : मुंबई मिरा भाईंदर येथे भारतीय मानवाधिकार परिषदच्यावतीने येवला येथील रेखा माधव साबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस अवॉर्डने गौरविण्यात आले.
भारतीय मानवाधिकार परिषद संस्थेच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त जीसीसी हॉटेल क्लब येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येवला येथील वांचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा साबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पुरस्कार हुमन राईटस् अध्यक्ष शेख हाजी, राजेंद्रसिंह वालीया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
सूत्रसंचलन अंकित खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमास राजेश शुक्ला, दिपू सिंग, राहुल शर्मा, शितल परदेशी, वैभव साबळे यांचेसह जम्मू कश्मीर, मध्य प्रदेश, गुजराथ, नेपाळ आदींसह देशभरातून निमंत्रित व पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
9
8
4
7