कृषीवार्ताब्रेकिंगस्थानिक
भुजबळांप्रमाणे जिल्हातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचेही वन टाइम सेटलमेंट करा : निवेदन

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग व साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची वन टाइम सेटलमेंट करून जिल्हा बँकेने संपूर्ण व्याज व मुद्दल रक्कमेत सूट देऊन उरलेल्या रक्कमेचे हप्ते करून कर्जफेडीची सवलत दिली आहे. त्या प्रमाणे जिल्हातील सर्व सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची वन टाइम सेटलमेंट करा, अशी मागणी कर्जदार शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वरे केली आहे.
येवला सहाय्यक निबंधक यांना सदर निवेदन देण्यात आले. जिल्हा बँक हि शेतकर्यांना शेतीसाठी कर्ज देणारी बँक आहे.आम्ही सर्व शेतकर्यांनी शेतीसाठी पिक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेले होते. परंतु कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी शेत मालाला योग्य बाजार भाव न मिळाल्यामुळे तर कधी शासनाच्या चुकीच्या व अन्यायकारक कर्ज माफीच्या धोरणामुळे आम्ही अडचणीत आलो. त्यामुळे सहकारी सोसायट्यांचे कर्ज भरू शकलो नाही, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा बँकेने मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग व साखर कारखान्याला कर्ज दिले होते. त्यांचे ते कर्ज मंत्री महोदयांनी त्यांच्या खाजगी उद्योग धंद्यासाठी घेतले होते व ते थकीत झाले होते. त्यांची वन टाइम सेटलमेंट जिल्हा बँकेने संपूर्ण व्याज व मुद्दल रक्कमेत सूट देऊन त्यांना उरलेल्या रक्कमेत समान चार हप्ते करून कर्ज फेडण्याची सवलत दिलेली आहे. त्याचा त्यांनी पहिला हप्ता नुकताच भरलेला आहे. त्या प्रमाणे आम्हा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पण वन टाइम सेटलमेंट केले तर आम्ही हि आमची थकबाकी भरून अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेस भुजबळ साहेबांप्रमाणे सहकार्य करू, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर रवींद्र आहेर, भाऊसाहेब ठोक, रामदास आहेर, गोरखनाथ खैरनार, दत्तात्रय आहेर, भगवान राऊत, बाळनाथ देवरे, जनार्दन आहेर, भाऊसाहेब घुमरे, चांगदेव शेळके, छगन दिवटे, गणपत लभडे, पुंजाराम कदम, रमण शेळके, दिनकर आहेर, शिवाजी खैरनार आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, जिल्हातील सर्व सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचीवन टाइम सेटलमेंट न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
0
9
8
4
4