Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रस्थानिक

येवल्यात २३ मार्चला देशातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन 

नामवंत कलावंत, साहित्यिक होणार सहभागी : शरद शेजवळ 

0 0 9 8 4 4

येवला (प्रतिनिधी) : भारतीय संविधानिक विचार, तत्व, मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन, विविध सांस्कृतिक कलाविष्कारातून लोकरंजनातून लोक प्रबोधन- सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रविवार, (दि. २३ मार्च) रोजी शहरातील विंचूर रोडवरील जनता विद्यालय येथे देशातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक तथा निमंत्रक शरद शेजवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पंचायत समिती शिक्षण विभाग, भारतीय अकॅडमी, कास्ट्राईब शिक्षक संघटना, राष्ट्र सेवादल, अध्यापकभारती संमेलनाचे संयोजक आहेत. संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत असणार असून उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे असणार आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे संचालक सिने- नाट्य अभिनेते व पार्श्वगायक डॉ.गणेश चंदनशिवे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, साहित्यिक तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, नाशिक जिल्ह्या ग्रामीण पोलीस उपायुक्त वासुदेव देसले, पैठणी उद्योजक बाळासाहेब कापसे, राष्ट्र सेवादलाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते मोहन अडांगळे, राहुल बच्छाव, प्रा.डॉ.भाऊसाहेब गमे, एस.पी.पवार, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी तुषार आहेर, जेष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ, एस.एस.गायकवाड, दत्तकुमार उटावळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात भारतीय राज्यघटना अर्थात राष्ट्रग्रंथ भारतीय संविधान यावर संविधान कीर्तनकार ह. भ. प. शामसुंदर महाराज किर्तन सादर करणार असून शाहीर स्वप्निल डुंबरे संविधान पोवाडा, शाहीर हमीद सय्यद संविधान भारुड, शाहिरा रितू गोरे संविधान अभंग, शाहीर प्रा. तुळशीराम जाधव संविधान शाहिरी जलसा- संविधान कव्वाली प्रा. शाहीर प्रवीण जाधव संविधान कलगीतुरा व भेदकी शाहिरी सुप्रसिद्ध खंजेरी वादक शाहिरा मीराबाई उमप संविधान प्रबोधन गीते तर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक संविधानाच्या जात्यावरील ओव्या सादर करणार आहे. संमेलनाच्या समारोप सत्रात संविधान संवर्धनासाठी लोककलाकारांची भूमिका या विषयावर लोककलांचे अभ्यासक प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बुरंगे पाटील सहभागी होणार असल्याचे शेजवळ यांनी सांगितले.

मानवाने श्रमपरिहारसाठी विविध कला विकसित केल्या समाजात रूढ झालेल्या विविध प्रकारच्या लोककला ह्या लोक प्रबोधनाचे कार्य करू शकतात यास भारतभूमीत मोठा वारसा आहे. बुद्धकालीन कला ते आजच्या आधुनिक कला प्रकारात लोकांच्या धडावर लोकांचा मेंदू राहावा आणि लोक रंजनातून लोकप्रबोधन व्हावे ह्या हेतूने आपणा भारतीय लोकांना ज्या राष्ट्रग्रंथाने माणुसकीचे मानवतेचे हक्क अधिकार बहाल केले त्या राष्ट्रग्रंथातील अर्थात संविधानातील तत्त्वविचार मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन विविध प्रबुद्ध लोककलांमधून करण्याच्या हेतूने भारतातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन आपण आयोजित केले आहे असे मत संविधान लोककला साहित्य संमेलनाचे प्रवर्तक व निमंत्रक शेजवळ यांनी सांगितले.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी, स.७:३० वा.संविधान सन्मान रॅली आझाद चौक येवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन संमेलन स्थळी जनता विद्यालय विंचूर रोड येवला इथपर्यंत येईल. ९:०० वा.चहा व नाश्ता उद्घाटन सत्र सकाळी ९:३० ते ११ वा. सकाळी ११ ते १२ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्यामसुंदर सुंदर महाराज (परळी वैजनाथ) यांचे संविधान कीर्तन, ११:३० ते १२ वाजता सुप्रसिद्ध शाहिर इंजिनिअर स्वप्निल डुंबरे (सिन्नर) यांचा संविधानाचा पोवाडा, दु.१२ ते १२:३० वा. सुप्रसिद्ध भारूडकार शाहीर हमीद सय्यद (शेवगाव-अहिल्यानगर), १२:३० ते १ संविधान अभंग सादरकर्ते कुमारी रितू गोरे व सहकारी येवला, १ ते २ भोजन अवकाश, २ ते २:३० संविधान शाहिरी जलसा सादर करते प्रा. शाहिर तुळशीराम जाधव आणि सहकारी (संगमनेर), २:३० ते ३ वा. संविधान प्रबोधन गीत गायन सादरकर्त्या शाहिरा मीराबाई उमप (छत्रपती संभाजीनगर), ३ ते ३:३० वा. संविधान जात्यावरच्या ओव्या सादरकर्ते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक येवला,  दुपारी ३:३० ते ४:०० वा. शाहीर तुषार सूर्यवंशी व गायिका स्वाती त्रिभुवन (मुंबई) यांचे संविधानाचे गाठोडेचे सादरीकरण, सायं ४ ते ५ वा. परिसंवाद – विषय : संविधान संवर्धनासाठी लोककलावंतांची भूमिका अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे. समारोप सायंकाळी होईल.

संविधान लोककला साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी  संयोजक गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, प्रवर्तक व निमंत्रक शरद शेजवळ, संयोजक सुमेध थोरात, शैलेंद्र वाघ, राजरत्न वाहुळ, गोकुळदास वाघ, विनोद सोनवणे, अमीन शेख, अजीज शेख, सुरेश खळे, वनिता वाघ, सुभाष वाघेरे, नुमान शेख, गायत्री खोकले, शरद अहिरे, सुनील गोविंद, ॲड. चंद्रकांत निकम, नियोजन समिती सदस्य शंकर आहिरे, संतोष सोनवणे, योगेश्वर सोनवणे, सोमनाथ खळे, जनार्धन धनगे, राजेंद्र दूनबळे, बाबासाहेब धिवर, संतोष सोनवणे, बापू वाघ, गजानन सूर्यकर, स्वाती अवताडे, अक्षय गरुड, शितल वाहुळ, खुशी गायकवाड, सुप्रिया कुऱ्हाडे, रोहन मढवई हे प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, पत्रकार परिषद प्रसंगी समेलनाच्या बोध चिन्हाचे प्रकाशन गट शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शैलेंद्र वाघ, राजरत्न वाहुळ, विनोद सोनवणे, गोकुळदास वाघ, सुरेश खळे, बापूसाहेब वाघ, प्रा. डॉ. जिभाऊ मोरे, सुनील गोविंद आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे