Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियस्थानिक

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभेसह सर्वच निवडणुका लढवणार : अण्णासाहेब कटारे 

येवल्यात १३ ऑक्टोबरला जाहीर अभिवादन सभा

0 0 9 8 4 4
येवला (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पाेहचविण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रात पक्ष भक्कमपणे उभा राहिला आहे.  त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसह सर्वच निवडणुका पक्षाच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्याचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले.
येवला शासकीय विश्रागृहावर आयोजित पञकार परिषदेत कटारे बाेलत होते. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. तळागाळातील सर्व घटकांना बराेबर घेवुन महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
१३ ऑक्टोबर राेजी येवला शहरात धर्मांतर घाेषणेचा वर्धापन दिन पक्षाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने येवला शहरात जाहीर अभिवादन सभा राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेण्यात येणार असून भिमगीताचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे कटारे यांनी सांगितले.
यावेळी गिताराम घाेडेराव यांची येवला तालुकाध्यक्ष पदी, गणेश अहिरे यांची तालुका उपाध्यक्ष पदी, तर सुभाष शिकलकर यांची येवला शहराध्यक्षपदी तसेच कृष्णा ञिभुवन यांची येवला युवा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे कटारे यांनी जाहीर केले.
दरम्यान,  कटारे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते तुषार वाघ, जेष्ठ नेते सत्यवान वाघ, जिल्हा प्रवक्ते प्रशांत कटारे,  युवा नेते बबनराव वाघ, जिल्हा नेते वाल्मिक खरात, नरेश सारसर, नवनाथ शेजवळ, राहुल धिवर, मच्छिंद्र अहिरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे