Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगस्थानिक

अंदरसुल जिल्हा बँक शाखा चोरी प्रकरणी तिघांना शिक्षा; दोघांची निर्दोष मुक्तता

0 0 9 8 4 4
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंदरसुल जिल्हा बँक शाखा फोडून तिजोरीतील रोख रक्कम चोरी प्रकरणी येवला न्यायालयाने शेख तौसिफ शकील, नंदकिशोर किसन धनगे व शंकर उर्फ भेंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. तर अजित रामदास कोल्हे, संतोष उर्फ सोनु गोरख वल्टे, दोघे रा. अंदरसुल, ता. येवला यांची सदरच्या गुन्हयातुन पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी शेख तौसिफ शकील, अजित रामदास कोल्हे. नंदकिशोर किसन धनगे, संतोष उर्फ सोनु गोरख वल्टे व शंकर उर्फ भंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, जि. नाशिक यांनी संगणमताने एन.डी.सी.सी. बैंक, शाखा-अंदरसुल फोडण्याचा कट करुन त्यात बँकेच्या दरवाज्याचे कुलुप कटरने तोडुन आत प्रवेश करून बँकेची तिजोरी ही गॅस कटरने वितळवुन कापुन तिजोरीतील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला म्हणुन तालुका पोलिसात या आरोपींविरुध्द भादविक 457, 380, 511, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर घटना २७ मार्च २०१५ ते २८ मार्च २०१५ दरम्यान घडली होती.
पोलीस हवालदार भागवत बाबुराव पगार यांनी सदरच्या गुन्हयाचा तपास करुन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रस्तुत प्रकरणामध्ये फिर्यादी तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरलेली आहे. यामध्ये सरकारपक्षातर्फे एकुण 8 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा व बचावपक्षाचा युक्तीवाद एकुण सदर गुन्हयात  येवला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी 28 मार्च 2024 रोजी आरोपी शेख तौसिफ शकील, नंदकिशोर किसन धनगे व शंकर उर्फ भेंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, यांना सदरहु गुन्हयात दोषी ठरविले व आरोपी अजित रामदास कोल्हे, संतोष उर्फ सोनु गोरख वल्टे, दोघे अंदरसुल, ता. येवला यांची सदरच्या गुन्हयातुन पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी शेख तौसिफ शकील, नंदकिशोर किसन धनगे व शंकर उर्फ भेंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, यांना न्यायालयाने भा.द.वि. कलम 457 मध्ये दोषी ठरवित 3 वर्षे सक्त मजुरी व रक्कम रु. 5000/- प्रत्येकी दंड तसेच दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. 
आरोपी शेख तौसिफ शकील, नंदकिशोर किसन धनगे व शंकर उर्फ भंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, यांना न्यायालयाने भा.द.वि. कलम 380 मध्ये दोषी ठरवित 3 वर्षे सक्त मजुरी व रक्कम रु. 2000/- प्रत्येकी दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
आरोपी शेख तौसिफ शकील, नंदकिशोर किसन धनगे व शंकर उर्फ भंबु भगवान मिसाळ, सर्व रा. अंदरसुल, ता. येवला, यांना मा. न्यायालयाने भा.द.वि. कलम 120 (ब) मध्ये दोषी ठरवित 6 महिने सक्त मजुरी व रक्कम रु. 2000/- प्रत्येकी दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तर आरोपी अजित रामदास कोल्हे, संतोष उर्फ सोनु गोरख वल्टे, दोघे अंदरसुल, ता. येवला यांना भादविक 457, 380, 511, 120 (ब), 34 या गुन्हयातुन निर्दोष मुक्त करण्यात आले.
सदर प्रकरणामध्ये येवला न्यायालयात सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आनंद सज्जनदास वैष्णव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता चंदन दिलीपचंद लोढा यांनी काम पाहिले. व त्याकामी सहा. सरकारी अभियोक्ता सिध्दार्थ सुदाम भाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान खटल्याच्या कामामध्ये लिपीक संदीप मेढे, पोलीस हवालदार प्रविण वनवे, चंद्रकात इनामदार यांनी मदत केली.
5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे