Breaking
राजकियस्थानिक

येवल्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरअंगणवाडी सेविकांचे उदबोधन

0 0 9 8 4 4
येवला (प्रतिनिधी) : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येवला विधानसभा मतदारसंघ येथे  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थिती येवला विधानसभा मतदारसंघातील 200 अंगणवाडी सेविकांचा लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने उद्बोधन वर्ग घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मातांच्या बालकांच्या सोयीसाठी पाळणाघर व हिरकणी कक्षाची सोय अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मतदान केंद्राशेजारीच पाळणाघर असेल. त्यामध्ये मातांना व बालकांना बसण्याची सोय असणार आहे. तसेच लहान बालकांसाठी खेळणी आणि आहाराची सोय असल्याने महिला मतदारांना मतदान करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 
सदर उदबोधन वर्गात अंगणवाडी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्य करण्याची संधी कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली आहे तरी सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
सदर प्रशिक्षणासाठी निवासी नायब तहसीलदार पंकज मगर, महिला बाल विकास अधिकारी वंदना शिंपी, आरती गांगुर्डे, पर्यवेक्षिका वंदना खांदवे, गीतांजली शिरसाट, सुनील महाजन उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे