
येवला (प्रतिनिधी) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल भागात क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी ३ कोटींच्या विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीत शादिखाना, रस्ते काँक्रिटीकरण, लाईट सुविधा, ईदगाह मैदान संरक्षण भिंत, कब्रस्तान संरक्षक भिंत व अनुषंगिक कामांचा समावेश आहे. या कामांना लवकरच सुरुवात होऊन नागरिकांना पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे.
यामध्ये येवला नगरपरिषद हद्दीतील नागडे रोड येथील बडा कब्रस्तान येथे वॉलकंपाऊंड बांधणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ५० लाख, तर ग्रामीण भागात येवला तालुक्यातील कौटखेडे, तळवाडे येथे मुस्लीम वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण व अनुषंगिक कामे करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख, रहाडी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना २० लाख, मुखेड येथे कब्रस्तानामध्ये कॉक्रिटीकरण करण्यासाठी १५ लाख, विखरणी येथे कबस्तानाकडे जाणारा रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, अंदरसुल येथे इदगाह मैदान कॉक्रिटीकरण व अनुषांगिक कामे करण्यासाठी १० लाख, उंदिरवाडी येथे मुस्लिम वस्तीत शादीखाना इमारत बांधण्यासाठी २० लाख, न्याहारखेडे बु. येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण व अनुषंगिक गटार बांधकाम करण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे रजानगर येथील शादीखाना बांधकाम करणे व रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी २५ लाख, शिरवाडे येथे कब्रस्तानास संरक्षण भित बांधण्यासाठी १० लाख, कोळगाव येथे मुस्लिम वस्तीत शादीखाना बांधणे व रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी १५ लाख, नांदूरमध्यमेश्वर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत, शेडचे बांधकाम, रस्ता कॉक्रीटीकरण व लाईटची सुविधा करण्यासाठी १५ लाख, खडकमाळेगाव येथे मुस्लिम समाजाकरिता शादीखाना बांधकाम करण्यासाठी २० लाख, लासलगाव येथे शादीखाना बांधण्यासाठी २५ लाख तर विंचूर येथे निफाड रोड इदगाह करिता संरक्षक भिंत आणि ओटा बांधकाम व अनुषंगिक कामे करण्यासाठी २० लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.