गुन्हेगारीब्रेकिंगस्थानिक
येवल्यात वाहतूक कोंडीने अपघातात विद्यार्थिनीचा बळी

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : शहरातील विंचूर चौफुली वरील वाहतुक कोंडीत झालेल्या अपघातात पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा बळी गेला आहे.
शनिवारी, (दि. 13) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास शिकवणी वरून सायकलने घरी परतत असताना, विंचूर चौफुलीवर रस्ता ओलांडताना भूमिका परेश पटेल (वय 15) रा. येवला या विद्यार्थिनीचा टँकरच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर (क्रमांक MH 04 HD 4530) चालक भरधाव वेगाने मनमाड कडे पळाला. मात्र, चौफुलीवरील गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनात बसून सावरगाव येथे सदर टँकर अडवला. सदर टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
विंचूर चौफुलीवरील अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यात अपघातांचे प्रमाण वाढते आहे. घटना घडल्यानंतर अतिक्रमण हटवले जाते मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
9
8
4
4