स्थानिक
येवल्यातील चौफुलींवर विद्युत सिग्नल गतिरोधक बसविण्याची मागणी
मुख्याधिकारी, प्रांताधिकारी यांचेसह संबंधितांना निवेदन सादर

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : शहरातील विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका चौफुली, गंगादरवाजा नाका चौफुली याठिकाणी विद्युत सिग्नल व गतिरोधक बसविण्याची मागणी येवला व्यापारी महासंघ, तालुका मराठी पत्रकार संघ यांचेसह शहरवासीयांनी एका लेखी निवेदनाद्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी, प्रांताधिकारी यांचेसह संबंधितांकडे केली आहे.
येवले शहरात असणाऱ्या नगर- मनमाड राज्य महामार्गावर येवला विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका चौफुली, गंगादरवाजा नाका चौफुली याठिकाणी प्रचंड वाहतुकीची वर्दळ आहे. सर्व माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी याच महामार्गा वरून ये-जा करतात. तारेवरची कसरत करीत नागरिक व शालेय विद्यार्थी या सर्व चौफुली वरून मार्गक्रमण करीत असतात. नगर-मनमाड राज्य महामार्गावर झालेले अतिक्रमण ही नेहमीची डोकेदुखी आहे. हे अतिक्रमण देखील अपघातास कारणीभूत आहे. ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावी, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
चौफुली परिसरात किमान पंधरा दिवसात एखादा मोठा अपघात होऊन त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे. हे अत्यंत क्लेशदायक आहे. सदर ठिकाणी विदुयत सिग्नल गतिरोधक बसविण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. शिवाय या पूर्वी सन २०१९-२० मध्ये सिग्नल बसविण्या संदर्भात तत्कालीन मुख्याधिकरी श्रीमती संगीता नांदुरकर मॅडम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी प्रस्ताव पाठवल्याची नोंद येवला नगरपालिकेच्या दप्तरी आहे. तत्कालीन परिस्थितीत त्याचा पाठपुरावा नसल्याने प्रस्ताव प्रलंबित आहे. माध्यमांनीही याबाबत वेळोवेळी आवाज उठविला आहे. परंतु सिग्नल गतिरोधक बसविण्या बाबत कोणीही जबाबदारी स्वीकारून याबाबत दखल घेतली गेली नाही. शनिवारी, 13 एप्रिलला एका निष्पाप युवतीचा बळी एका भरधाव टँकरने घेतला. ही घटना येवले शहरवासीयांचे हृदय पिळवटून टाकणारी आहे, असेही सदर निवेदनात म्हटले आहे.
विद्युत सिग्नल बसवण्या संदर्भात योग्य ती कार्यवाही महिना भरात करावी. अन्यथा, एक महिन्यानंतर येवला शहरवासीयांची एकत्रित सभा घेऊन त्यात येवला विंचूर चौफुली वर दिवसभर चक्काजाम करण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेनावर धीरजसिंग परदेशी, दिनेश आव्हाड, योगेश सोनवणे, किरण कुलकर्णी, रमेश भरते, सचिन सोनवणे, संजय हिरे, मनोज भावसार, प्रमोद सस्कर, मीननाथ पवार, संदीप मोरे, अविनाश कुकर, विजय गोसावी, सचिन आहेर, अनिल करवा, मनीष क्षत्रीय, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. महेश जोशी, पुरुषोत्तम काबरा, समीर दीक्षित, अतुल घटे, दीपक भदाणे, राहुल लोणारी, आशिष अंकाईकर, मयुरेश पटेल, गणेश हरके, रवी पवार, स्वानंद काबरा, रवींद्र गुंजाळ, विशाल चंडालिया आदींसह शहरवासीयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0
0
9
8
4
4