स्थानिक
कुणबी जात प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुलभ करा : प्रांताधिकारी यांना निवेदन
प्रमाणित नोंदींची अट रद्द करा; सकल मराठा समाजाची मागणी

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : येवला तहसील कार्यालयातील नोंदणी विभागात कुणबी नोंदींची प्रमाणित नक्कल काढण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून शेकडो अर्ज प्रलंबित असून जीर्ण झालेले, अर्धवट फाटलेले नोंदणी वारंवार हाताळण्याने नोंदींचे दत्त आणखी फाटण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायमूर्ती शिंदे समिती च्या निर्देशानुसार कुणबी नोंद शोध मोहिमेत शेकडो नोंदी सापडल्या असून नागरिक नोंदींची प्रमाणित प्रत घेण्यासाठी नोंदणी विभागात गर्दी करत आहेत, अनेक नागरिक 15 दिवसापासून नोंदणी करिता चकरा मारत आहेत. त्यामुळे कुणबी नोंदींची शासनाच्या वेबसाईटवर झालेली ऑनलाइन नोंदींची प्रिंट पुरावा म्हणून ग्राह्य धरा, प्रमाणित नोंदींची अट रद्द करा, वंशावळ नोंदी कागदपत्रा साठी वेगळा क क्षबाबत चालू करा व कुणबी प्रमाणपत्र प्रकिया सुलभ करा अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज प्रांताधिकारी गाढवे यांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश देऊन ही येवल्यात कुणबी प्रमाणापत्र वाटपात अजून सुलभता आलेली नाही. प्रमाणित नोंदी काढण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. शासनाने शोधलेल्या नोंदी आणि वेबसाईटवर उपलब्ध नोंदी महसूल विभागाने आवश्यकता वाटल्यास स्वतः प्रमाणित कराव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
निवेदनावर झुंजारराव देशमुख, भागवतराव सोनवणे, सचिन आहेर, महेश काळे, दिनेश पागीरे, विजय पठाडे, वाल्मिक मगर, शरद जगताप, कुलदिप गवळी, समाधान मिटके, प्रकाश गुडघे, दत्तात्रय हाडोळे, ललित खैरणार,श्याम गुंड, गोरख गुंड, ज्ञानेश्वर गुंड, राजेंद्र नाईकवाडे, बालाजी गुंड, अनिल धनगे, प्रवीण देवरे, अनिल देवरे, श्रावण देवरे, बाळनाथ खानदेशी , साहेबराव गाडे आदींच्या सह्या आहेत.
शासनाच्या एन आय सी च्या वेबसाईट वर उपलब्ध केलेल्या कुणबी नोंदींची ऑनलाइन प्रिंट ग्राह्य धरण्यात यावी , पुन्हा पुन्हा जीर्ण कागद हाताळणे थांबवावे, प्रमाणित नोंदी चा खर्च आणि लागणार वेळ या दुष्टचक्रातून तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा-– भागवतराव सोनवणेसकल मराठा समाज, कार्यकर्ता
0
0
9
8
4
4