प्रासंगिकब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियस्थानिक
येवला मतदारसंघात 65.38 टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी येवला विधानसभा मतदारसंघात 65.38 टक्के मतदान झाले आहे. एकूण 205669 मतदारांपैकी 90196 स्री, 115472 पुरुष तर इतर एका मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला.

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तर दुपारी एक वाजेनंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदानाचा वेग मंदावला. मात्र, दुपारी चार वाजेनंतर पुन्हा मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसून आले. शहरात मुस्लिम भागासह इतर ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

तालुक्यातील देवळाणे येथे सायंकाळी साडे सात वाजे पर्यंत मतदान सुरू होते. नवोदित मतदारांसह नव्वदीपार वृद्ध मतदारांमध्ये ही मतदानाचा उत्साह होता. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे व्यत्यय आल्याची घटना वगळता मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. मतदाना दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.
येवला मतदार संघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.2%, एक वाजेपर्यंत 32.8%, तीन वाजेपर्यंत 40.67% तर पाच वाजेपर्यंत 50.33% मतदान झाले.

मतदानासाठी अमेरिकेतून येवल्यात
अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या पारेगाव (ता. येवला) येथील युवक प्रतीक महाजन याने अमेरिकेतून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रतीक अमेरिकेतील शिकागो या राज्यात वास्तव्यास असून तो तेथेच एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करीत आहे. वास्तव्य जरी परदेशात असले तरी भारतातील सर्व घडामोडीवर आपण लक्ष ठेवून असतो. त्यामुळेच मी खास मतदान करण्यासाठी, माझ्या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी, देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती देण्यासाठी मी भारतात आलो आहे, असे प्रतीकने सांगितले.

अंदरसुल येथे ६४ % मतदान
अंदरसुल येथे रणरणत्या उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथील एकूण नऊ बुथ पैकी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुथ क्रमांक १९० वर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ उडाला मात्र अर्ध्या तासानंतर मतदान सुरळीत पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. नवोदित तरुण, वृद्ध महिला-पुरुष यांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले. एकूण १००२० मतदारांपैकी ३७३१ पुरुष मतदार व २६८७ स्त्री मतदार अशा एकूण ६४१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ६४.०५ टक्के मतदान झाले.
नगरसुल येथे 59.60%, चिचोंडी बुद्रुक येथे 67.94%, मानोरी बुद्रुक येथे 63.37%, गुजरखेडे येथे ७१ टक्के, निमगाव मढ येथे 61.71%, आडसुरेगाव येथे 59%, गोरख नगर येथे 79.76%, चिचोंडी खुर्द येथे 63.95% मतदान झाल्याची माहिती आहे.

0
0
9
8
4
4