
0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : नायलॉन मांजाने गळा व गाल कापल्या गेल्याने सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सोमवारी, (दि. १) रोजी अंकाई- चांदगाव रोडने मोटारसायकलने आपल्या आजोबा सोबत येत असताना मल्हार नितीन राऊत (वय ७) या मुलाच्या मानेत कटलेल्या पतंगाचा मांजा अडकला. यात मल्हारचा गळा व गाल कापल्या गेला. जखमी मल्हार यास येवल्यातील चंडालिया हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. जखम खोलवर व गंभीर असल्याने त्यास चाळीस टाके घालावे लागल्याचे डॉ. राहुल चंडालिया यांनी सांगितले.
शासनाकडून नायलॉन मांजावर बंदी असून देखील शहरासह तालुक्यात नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री होत असल्याची चर्चा आहे. संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
0
0
9
8
4
4