
नाशिक (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम दिनांकअखेर म्हणजेच दि. 3 मे पर्यंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 उमेदवारांकडून 29 नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
यात जीवा पांडु गावित (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, सुभाष रामु चौधरी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भास्कर मुरलीधर भगरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, शिवाजी धर्मा बर्डे (भारत आदिवासी पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, पल्लवी भास्कर भगरे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, बाबु सदु भगरे (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, भारती प्रविण पवार (भारतीय जनता पार्टी) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे, हरिश्चंद्र देवराम चव्हाण (अपक्ष) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे, भारत अरूण पवार (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, धोंडीराम किसन थैल ( बळीराजा पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, संजय कांतीलाल चव्हाण (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशन पत्र, तुळशिराम चिमण खोटरे (बहुजन समाज पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अनिल गवळीराम बर्डे ( अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, मालती राहुल थविल (वंचित बहुजन आघाडी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, गुलाब मोहन बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, काशिनाथ सिताराम वटाणे (ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, अशोक मधुकर घुटे (अपक्ष) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, किशोर अंबादास डगळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1 नामनिर्देशनपत्र, खान गाजी इकबाल अह. (अपक्ष ) (ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन) अशी 2 नामनिर्देशनपत्रे व दिपक गणपत जगताप (अपक्ष ) यांनी 1 नामनिर्देशनपत्र सादर केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 20 उमेदवारांनी एकूण 29 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.