येवला तालुका पोलीसांकडून १४ किलो गांजासह ५ लाख ९८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
चौघा विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल

येवला (प्रतिनिधी) : ९८ हजार रुपये किंमतीच्या १४ किलो गांजासह इरटीगा वाहन असा ५ लाख ९८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चौघांना तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली ताब्यात घेतले आहे.
नाशिक जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन अवैथरित्या गुटखा, अंमली पदार्थ व मद्याची होत असलेली तस्करी रोखून कारवाई करणेबाबत नाशिक ग्रामीण (जिल्हा) पोलीस अधिक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरु आहे. रविवारी, (दि. ४) मध्यरात्रीचे सूमारास अहमदनगर- मनमाड या राज्य महामार्गाने मनमाड बाजूकडून एका लाल रंगाच्या इरटिगा कारमध्ये काही संशयित इसम अवधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती येवला तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. पांडुरंग पवार यांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलीसस्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपाळवाडी फाटा, सावरगाव शिवार ता. येवला जि. नाशिक येथे सापळा रचला असता, मनमाड बाजुकडुन अहमदनगरच्या दिशेने येत असलेली इरटिगा वाहन क्रमांक. एमएच ०५ बीएस ४४१० हि येताना दिसली. मिळालेल्या बातमीतील संशयित चारचाकी वाहन हेच असल्याचे खात्री झाल्याने सदर गाडी थांबवुन वाहनाची झड़ती घेतली असता, त्यात प्लॉस्टीकच्या दोन गोण्यामध्ये १४ किलो गांजा सुमारे ९८,०০o/- रुपये किंमतीचा मिळून आला. सदर कारवाईत इरटिगा वाहनासह त्यात मिळून आलेला गांजा असा एकुन ५ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुदेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी इरटिगा वाहन चालक – सनी कारभारी भातकुटे (वय ३७ वर्ष) रा. ब्राम्हण गल्ली, दत्तमंदीराजवळ, राहाता ता. राहाता जि. अहमदनगर व वाहनातील इसम १) अशोक उर्फ अक्षय राजू पगारे (वय २७ वर्ष) रा. साई कॉलनी, रांजणगाव रोड, राहाता ता. राहाता जि. अहमदनगर, २) समीर आक्रम शेख (वय २६ वर्ष) मुळ रा. मोमीनपुरा, एक मिनार मज्जीद बीड हल्ली रा. बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लाम नगर शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर, ३) प्रशांत जनार्दन जाधव (वय २२ वर्ष) रा. साई कॉलनी, रांजणगाव रोड, राहाता ता. राहाता जि. अहमदनगर यांचे विरुद्ध संगनमत करुन सदर वाहनामध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ्थ १४ किलो वजनाचा उग्र वासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उदेशाने कब्जात बाळागुन वाहतुक केली म्हणुन येवला तालुका पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस. कायदा सन- १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) खंड२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता गिरी या करीत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. विक्रम देशमाने, मालेगाव विभाग अपर पोलीस अधिक्षक श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री. सहेल शेख यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्थन बहिर, परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हेंबाडे, पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस शिपाई आबा पिसाळ, गणेश बागुल, मुकेश निकम, संदीप दराड़े, चालक पोलीस हवालदार शाम थेटे यांनी सदरची कारवाई केली.