Breaking
स्थानिक

विकासकामांच्या माध्यमातून उपलब्ध सेवा-सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे : मंत्री छगन भुजबळ

0 0 9 8 4 7

निफाड (प्रतिनिधी) : नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारची विकास कामे केली जात आहेत. या उपलब्ध झालेल्या सुविधा व वास्तू यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजिक, चंद्र सुर्य मंदिर मरळगोई रोड व भरवस फाटा येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, सीताराम आंधळे, सरपंच काशिनाथ माळी, सचिन दरेकर, निवृती जगताप, उपसरपंच लतिफ तांबोळी, माधव जगताप यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ६ कोटी ७० लक्ष निधीतून लासलगाव बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येईल. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेसाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. पाणी हा अतिशय महत्वाचा विषय असून कुणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुक्यातील विविध गावांमधील तलाठी व मंडळ कार्यालयांच्या उभारणीसाठी निधी मंजूर झाला असून ती कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शिवनदीचे सौंदर्यीकरणासाठीही १५ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आला असून नागरिकांनी हा परिसर स्वच्छ राहील यादृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे. घरकुल योजनेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आहे. त्यामुळे एकही नागरिक घरकुलांपासून वंचित राहणार नाही यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.

लासलगाव रेल्वे उड्डाणपुल, लासलगाव विंचूर रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच पिंपळस ते येवलापर्यंत चौपदरीकरण रस्त्याचे काँक्रीटीकरण यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

लासलगांव पोलीस स्टेशन इमारत बांधकामाची भुजबळ यांनी केली पाहणी

मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस स्टेशन इमारत बांधकामाची यावेळी पाहणी केली. सदर इमारतीचे काम येत्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावे. तसेच इमारत सौंदर्यीकरणाचे कामही उत्तम रीतीने करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भास्कर शिंदे, पोलीस उप निरिक्षक अशोक मोकळ, प्रविण उदे आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे