गंगासागर तलावाच्या पुनरुज्जीवन व सुशोभीकरण कामाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

येवला, (प्रतिनिधी) : अमृत २ अभियानातून ५ कोटी रुपये निधीतून येवला शहरातील गंगासागर तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करणे व हरित क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगर अभियंता आर.व्ही. सुतावने, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, गोरख शिंदे, अविनाश कुक्कर, गोटू मांजरे, पार्थ कासार, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजबळ यांच्याकडून अभिवादन
राष्ट्रमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालय माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.