Breaking
कृषीवार्तास्थानिक

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरण कामाची दिलीप खैरे यांच्याकडून पाहणी

राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेच्या विकास कामांचीही केली पाहणी

0 0 9 8 4 4
येवला (प्रतिनिधी) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा अस्तरीकरण व ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी पाहणी केली.
येवला विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नावारूपाला आलेल्या महत्त्वकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव – दरसवाडी -डोंगरगाव पोहोच कालव्याच्या पूर्णत्वासाठी मागील अधिवेशनात २४२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पुणेगाव ते डोंगरगाव दरम्यान संपूर्ण कालव्याचे रुंदीकरणा बरोबरच काँक्रिटीकरणाचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी नद्या नाल्यांवरील पूल, गेट, तसेच इतर कामे पूर्ण करण्यात येणार असून आगामी पावसाळ्यात मांजरपाडाचे पाणी डोंगरगाव बंधा-यापर्यंत पोहवीणारच असा निर्धार नुकताच येवला येथील शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी नंदुरमध्यमेश्वर कालवा विभागाचे सर्व अधिकारी तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत कालव्यावर सुरू असलेल्‍या कामाची पाहणी केली. दरम्यान, विविध ठिकाणी कालव्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी प्रसंगी या कामाचे कंत्राटदार ‘देसाई इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने काँक्रिटीकरण कामासाठी उभारलेल्या आरएमसी प्‍लांटचा शुभारंभ खैरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी विशेष कार्य आधिकारी उदयसिंग राजपूत, स्विय सहाय्यक बी. आर. लोंढे, पाणी आंदोलक मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भगवान ठोंबरे, शिवसेना नेते वाल्मिक गोरे, श्रावण ठोंबरे, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, मकरंद सोनवणे, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सुमित थोरात, सचिन सोनवणे आदी प्रमुख पदाधिकारी तसेच कंपनीचे सर्व प्रमुख आधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष कालव्यावर काँक्रिटीकरण साहित्याच्‍या पहिल्‍या  गाडीचे प्रात्यक्षिक दाखविण्‍यात आले. लवकरच छगन भुजबळ व विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात येईल अशी माहिती खैरे यांनी दिली.
गेली दोन महीने मराठा आरक्षणाच्‍या पार्श्‍वभुमीवर राज्‍यभरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या वातारवणाचा राज्‍यभरातील लोकप्रतिनीधींच्‍या कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला होता. नागरिकांच्‍या प्रलंबीत व दैनंदिन समस्‍यांचा नियमित निपटारा व्‍हावा म्‍हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेवरुन सर्व शासकीय विभाग प्रमुखांची खैरे व विशेष कार्य अधिकारी उदयसिंग राजपुत यांच्‍या उपस्थितीत आढावा बैठक घेण्‍यात आली. सदर आढावा बैठकीत राजापूर सह ४१ गाव पाणीपुरवठा योजना, पुणेगाव दरसवाडी कालवा दुरुस्ती, आमदारांचा स्थानिक विकास निधी, अल्पसंख्यांक, सामाजिक न्याय व अनुसूचित जाती घटकांचा विकास, येवला शहरातील नगरपालिका अंतर्गत स्वच्छता व आरोग्य विभाग, कोटमगाव व खेडलेझुंगे तीर्थक्षेत्र विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, येवला शहर भुयारी गटार योजना, लोणजाई माता परिसर विकास सुधारित आराखडा, ग्रामीण रुग्णालय व उपकेंद्र आरोग्यकेंद्र प्रस्ताव, आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधित कार्यालयांना सूचना देण्यात आल्‍या. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांना तसेच सर्पदंशावरील प्रतिबंधक लस तात्काळपणे नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांना सूचना करण्यात आल्या.
यापुढेही मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेवरुन नागरिकांच्या समस्यांचा निय‍मीत निपटारा करण्यासाठी दर मंगळवारी आढावा बैठक घेण्यात येईल असे खैरे यांनी सांगितले. प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज संपर्क कार्यालयात आलेल्या अभ्यंगतांच्या वाहनांमुळे कार्यालया पुढे एकच गर्दी झाल्यामुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलला होता. या बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक नेते अंबादास बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, नवनाथ काळे, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, दिपक लोणारी, मोहन शेलार, ज्ञानेश्‍वर दराडे, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, श्रावण ठोंबरे, सुनील पैठणकर, मलिक मेंबर, अमजद शेख, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे आदि प्रमुख पदाधिका-यांसह सर्व शासकीय विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
दरम्‍यान, राष्‍ट्रवादीच्‍या प्रदेश कार्यकारणीत फेरनिवड झाल्‍यानंतर प्रथमच येवला दौ-यावर आलेल्‍या खैरे यांचे येवला शहर राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, महिला आघाडी त्‍याच प्रमाणे विविध सेलच्‍या पदाधिका-यांच्‍या वतीने ढोल ताशा, फटाके वाजवून जोरदार स्‍वागत करुन शाल पुष्‍पहार देऊन सत्‍कार करण्‍यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे