
0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने जीवदान दिले आहे.
पिंपळगाव लेप गावाजवळील ३५ फूट खोल असणाऱ्या सार्वजनिक विहिरीत अन्न-पाण्याच्या शोधात कोल्हा पडला. योगेश दौंडे यांना रविवारी, (दि.२८) सकाळी विहिरीत कोल्हा पडलेला असल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोकळे यांना माहिती दिली. तर ढोकळे यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वनविभागाचे अधिकारी अक्षय मेहेत्रे यांनी तत्काळ वनविभागाचे कर्मचारी पंकज नागपुरे, भाऊसाहेब माळी यांना घटनास्थळी पाठविले. तासाभराच्या प्रयत्नानंतर विहिरीतून कोल्हा बाहेर काढण्यास यश आले. या कामात सोमनाथ गोधडे यांनी विशेष मदत केली. त्यानंतर कोल्ह्यास शेतात सोडून देण्यात आले. दरम्यान, विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
0
0
9
8
4
4