
0
0
9
8
4
4
मुंबई (प्रतिनिधी) : येवला येथील जुने शिवसैनिक ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांचेसह शिवसैनिकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत प्रवेश केला आहे.
सोनवणे यांचेसह अंदरसुल येथील ग्रामपंचायत सदस्य ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल सोनवणे, किशोर बागुल, संतोष वल्टे, संदीप शेळके आदींनी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने येथील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे यांचे शिवसेनेत प्रवेश केला.
प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येवला तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी सत्कार केला. किशोर सोनवणे यांच्या प्रवेशामुळे शहर व ग्रामीण भागातील काही जुने शिवसैनिक शिंदे गटात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक गाव खेडे पिंजून काढून निष्ठावान शिवसैनिकांना सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून करू असे तालुकाप्रमुख शेळके यांनी यावेळी सांगितले.
0
0
9
8
4
4