Breaking
स्थानिक

पुनेगाव -दरसवाडी ते डोंगरगाव पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कालवा विस्तारीकरण व काँक्रीटीकरनाचे कामे मिशन मोडवर करा : मंत्री छगन भुजबळ

नगरपरिषद अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

0 0 9 8 4 4

येवला (प्रतिनिधी) : येवला विधानसभा मतदार संघातील उत्तर पूर्व परिसराला संजीवनी देणारा भुजबळांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगाव दरम्यानच्या कालव्याचे विस्तारीकरण तसेच पाझरणाऱ्या लांबीला अस्तरीकरण आदी कामांसाठी 250 कोटी रुपयांची विकास कामे तातडीने पूर्ण करा.येत्या पावसाळ्यात मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव मध्ये पोहोचवा अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत दिल्या.

पुणेगांव ते दरसवाडी दरम्यानची कामे मिशन मोडवर पुर्ण करण्यात यावी, पाणी वाहून नेताना प्रामुख्याने अडथळ्यांची कामे प्रारंभीच सुरू करून येत्या सहा महिन्यात कामे पूर्ण झालीच पाहिजे या दृष्टीने नियोजन करा. मी प्रत्येक आठवड्याला या कामांचा आढावा घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जलसंपदा विभागाच्या नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संगीता जगताप, पालखेड डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे उपकार्यकारी अभियंता रितेश जाधव, उप कार्यकारी योगिता घुगे, उपअभियंता संभाजी पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख, सागर झावरे आदीसह जलसंपदा, जलसंधारण, महसूल, नपा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

नगरपरिषद अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अग्निशमन व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण निधीतून येवला नगरपरिषदेस अग्निशमन वाहन वितरित करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, बाळासाहेब गुंड, डी. के. जगताप, हुसेन शेख, शफीक शेख, मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, विठ्ठल कांगणे, पुंडलिक होंडे, अर्जुन कोकाटे, तुळशीराम कोकाटे, संजय पगार, रावसाहेब आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुमित थोरात, मलिक शेख, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, अविनाश कुक्कर, संपत शिंदे, दीपक पवार, महेश गादेकर, विशाल परदेशी, गणेश गवळी, वाल्मीक कुमावत व पदाधिकारी उपस्थित होते.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कर्तुत्वाला उजाळा देण्यासाठी येवला शहराच्या मध्यवर्ती परिसरात “शिवसृष्टी प्रकल्प” साकारण्यात येत आहे. आज या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि माहिती घेतली. मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आपल्या येवल्याच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. राज्याला पथदर्शी ठरेल असा हा प्रकल्प असून या ‘शिवसृष्टी’मुळे आपल्या येवला शहराच्या सौंदर्यात नक्कीच मोठी भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाकडे व्यक्तिगत लक्ष ठेवून या कामाचा मी सातत्याने आढावा घेत आहे.

– मंत्री छगन भुजबळ.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे