
येवला (प्रतिनिधी) : येवला औद्योगिक सहकारी वसाहत संस्थेच्या चेअरमनपदी भोलानाथ लोणारी, व्हाईस चेअरमनपदी राजेश भंडारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यासी अधिकारी रवींद्र शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभा संस्थेच्या कार्यालयात बोलवण्यात आली होती. सदर सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार चेअरमनपदासाठी भोलानाथ लोणारी, व्हाईस चेअरमनपदासाठी राजेश भंडारी यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले. अध्यासी अधिकारी शेजवळ यांनी, चेअरमनपदी लोणारी, व्हाईस चेअरमनपदी भंडारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ नेते संचालक अंबादास बनकर, अनिल कुक्कर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक अरुण भावसार, सुकृत पाटील, शाम कंदलकर, प्रवीण पहिलवान, योगेंद्र वाघ, सुहास अलगट, चारुशीला काबरा, जयश्री काळे यांचेसह रामदास काळे, राजेंद्र पवार, पुरुषोत्तम काबरा, सोपान पैठणकर आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित व्हा. चेअरमन भंडारी यांचा सत्कार करताना योगेंद्र वाघ तर चेअरमन लोणारी यांचा सत्कार करताना प्रवीण पहिलवान.