
येवला (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 20, दिंडोरी लोकसभा मतदार संघ श्री. बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली येवला तहसील कार्यालय सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड, गटविकास अधिकारी, पालिका मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर , पोलीस निरीक्षक,येवला ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव, सर्व नायब तहसीलदार येवला, सर्व सेक्टर ऑफीसर 119 येवला विधानसभा मतदार संघातील, सर्व नोडल अधिकारी, विविध पथक प्रमुख व त्यांचे सहायक, 119 येवला विधानसभा मतदार संघातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
सदर बैठकीत साहित्य वाटप व साहित्य स्विकृती केंद्र, स्ट्राँग रूम, मतदान केंद्र भेट, आचार संहिता कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, विविध पथक स्थापन करणे, वेबकास्टिंग करावयाची मतदान केंद्र व त्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत अहवाल, आदर्श मतदान केंद्र , दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणारे मतदान केंद्र , महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणारे मतदान केंद्र व तरुण कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणारे मतदान केंद्र, SVEEP अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती, 85 व 100 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांचा आढावा, वाहतूक आराखडा आदी विषयांबाबत उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी येवला विधानसभा मतदार संघांचे सादरीकरण केले.
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सर्व नोडल अधिकारी आणि सर्व सेक्टर ऑफिसर, सर्व नोडल अधिकारी, विविध पथक प्रमुख यांच्या कामकाजाबाबत आढावा घेतला. निवडणूक शांत आणि निर्भयपूर्ण वातावरणात कशा प्रकारे पार पाडता येतील याबाबाबत योग्य ते मार्गदर्शनही पारधे यांनी केले. यामध्ये विशेषतः 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना, दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या पोस्टल बॅलेट सुविधेबाबत आणि निवडणूक घोषित झाल्याक्षणी लागू होणाऱ्या आचार संहिते बाबात त्यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार आबा महाजन तहसीलदार यांनी आभार प्रदर्शन केले.