येवला व्यापारी महासंघातर्फे दिनदर्शिका प्रकाशित

येवला (प्रतिनिधी) : येवला व्यापारी महासंघातर्फे स्थानिक व्यापाऱ्यांच्या सौजन्याने सन 2024ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.
व्यंग चित्रकार प्रभाकर झळके, कापसे पैठणीचे दिलीप खोकले, डॉ. महेश्वर तगारे, विजय मारशा यांचे प्रमुख उपस्थितीत शहरातील मेनरोड येथील गणेश मंदिरात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी झळके यांनी मार्गदर्शन करून काही सूचना केल्या. तर उपस्थित मान्यवर, जाहिरातदार व्यापारी बांधव यांचा महासंघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
येवला व्यापारी महासंघातर्फे प्रथमच दिनदर्शिकेची छपाई यावर्षी करण्यात आली. दिनदर्शिकेेतील जाहिरातदार व्यापाऱ्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले. दिनदर्शिकेेची संकल्पना महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, उपाध्यक्ष रितेश बुब, कार्यकारी अध्यक्ष अविनाश कुक्कर व ज्येष्ठ मार्गदर्शक राजेश भंडारी यांची होती. कार्यक्रमास अनेक असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य तसेच येवला व्यापारी महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय चंडालिया यांनी केले.