राहुरी तालुक्यातील वकील दांपत्याच्या हत्येचा निषेध
येवला तालुका वकिल संघाचे प्रांताधिकाऱ्याना निवेदन

येवला (प्रतिनिधी) : राहुरी (अहमदनगर) तालुक्यातील आढाव वकील दांपत्याची निघृण अमानवी हत्त्या करण्यात आली. या घटनेचा येवला तालुका वकिल संघाने जाहीर निषेध केला आहे. या बाबत प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निषेध निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील वकिल वर्ग हादरून गेलेला असुन वकिल वर्गात भितीचे वातावरण आहे. न्यायदानाचे पवित्र कामास मदत करणारे तसेच न्याय व्यवस्थेचा कणा असलेले वकिलांवर हल्ले होण्याच्या घटना घडत असेल तर संपूर्ण न्याय व्यवस्थेसाठी हि चिंतेची बाब आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत त्वरीत कारवाई करून आरोपींना अटक केलेली आहे. मात्र सदर आरोपींचा खटला जलद गती न्यायालयात चालवुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर करण्या यावी. तसेच न्याय व्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या वकिलांचे सुरक्षे विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले असुन सदर घटनेची शासनामार्फत गंभीर दखल घेवुन वकिलांचे सुरक्षेबाबत वकिल संरक्षण कायदा त्वरीत मंजुर करणेबाबत आपले स्तरावरून शासनास कळविण्यात यावे, अशी मागणीही सदर निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
निवेदन प्रसंगी येवला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. कदम, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र तिवारी, सेक्रेटरी ॲड. किरण देशमुख, खजिनदार ॲड. विक्रांत गायकवाड, ज्येष्ठ ॲड. अशोक खैरनार, ॲड. जुगलकिशोर कलंत्री, ॲड. भायभंग, ॲड. के. टी. पगारे, ॲड. प्रताप आहेर, ॲड. डी. एन. कदम, ॲड. दिलीप कुलकर्णी, ॲड. ई. जे. शिरसाठ, ॲड. भुषण पाटिल, ॲड. विठ्ठल नाजगड, ॲड. अमोल गायकवाड, ॲड. योगेश नाजगड, ॲड. संतोष शहा, ॲड. योगेश मोहरे, ॲड. कैलास सालमुठे, ॲड. रविंद्र गायकवाड, ॲड. सिमरन पंजाबी, ॲड. पल्लवी भोसले आदींसह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.