२५ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

येवला (प्रतिनिधी) : जमीन नोंद प्रकरण मंजूर करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी मनोहर राठोड यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.
राजापूर येथील तक्रारदार यांचे न्यायप्रविष्ठ असलेले जमीन नोंदीचे प्रकरण हे लोकसेवक मंडळ अधिकारी मनोहर राठोड यांनी नामंजूर केले होते. मात्र सदरचे प्रकरण मंजूर करून देतो याकरता ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोड करून २५ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी मनोहर राठोड यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे – वालावलकर तसेच अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस नाईक संजय ठाकरे यांनी बुधवारी, (दि. ३१) ही कारवाई केली.