
0
0
9
8
4
5
येवला (प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली
जयंती निमित्ताने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक येवला शहरात काढण्यात आली असुन सहा तासा नंतर मिरवणुकिची सांगता करण्यात आली. दरम्यान शहरातील गंगा दरवाजा येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर क्रमांक १ येथुन ढाेल तासाच्या तसेच डीजेच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक लाठे, खजिनदार सुभाष गांगुर्डे, यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
निळे ध्वज, पांढ-या रंगाच्या साड्या, तसेच पांढ-या रंगाचे कपडे परिधान करून महीला पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असाे, आले रे आले जयभीम वाले, हा आवाज काेणाचा जयभीम वाल्याचा, तथागत भगवान गाैतम बुध्दांचा विजय असाे अशा विविध घाेषणा देत मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा मिरवणूक रथावर ठेवण्यात आला हाेता. निळे फेटे परिधन करून युवकांनी भिम गिताच्या गाण्यावर ठेका धरला तर महीलांनी देखील डॉ. आंबेडकर यांच्या नांवाच्या घाेषणा देत भिम गितावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. मिरवणुकीत शहर परीसरातील बाैध्द बांधव मिरवणुकीत माेठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील विविध ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांचा शहरातील नागरीकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर मिरवणूक शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, गंगा दरवाजा येथुन निघाल्या नंतर शहरातील विविध मार्गांनी मिरवणुकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ करण्यात आली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक विलास पुजारी, पञकार विलास पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सार्वजनिक बुध्दवंदना घेण्यात येवुन मिरवणकिची सांगता करण्यात आली.
सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक लाठे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष सागर पडवळ खजिनदार सुभाष गांगुर्डे, तसेच पदाधिकारी सचिन साबळे, मिलींद गांगुर्डे, कुणाल लाठे, अशाेक पवार, संदीप जाेंधळे, कृष्णा पवार, महेंद्र हिरे, गाैतम लाठे, गणेश अहिरे, सिध्दार्थ ़ञिभुवन, आकाश झाल्टे, आदीसह बाैध्द बांधवांनी विशेष परीश्रम घेतले असुन सदर मिरवणूक नागरीक माेठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संजय गांगुर्डे यांनी मानले. मिरवणुकी दरम्यान चाेख पाेलिस बंदाेबस्त होता.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
0
9
8
4
5



