Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

राष्ट्रीय युवा महोत्सव ; सर्वांच्या उस्फूर्त सहभागातून उत्साहात साजरा करावा : मंत्री गिरिश महाजन

0 0 9 8 4 7

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथे होणारा 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव जिल्ह्यासाठी अभिमानस्पद बाब असून हा महोत्सव सर्वांच्या उस्फूर्त सहभाग व सहकार्यातून उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

आज विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय युवा महोत्सव नियोजनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड माणिक कोकाटे, दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास धिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राष्ट्रीय युवा महोत्सवास परराज्यातून स्पर्धक, खेळाडू, युवक-युवती येणार आहेत. त्यांची निवास, भोजन व्यवस्था व कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. त्याचप्रमाणे परराज्यातून येणाऱ्या या युवांसाठी त्यांच्या खाद्यसंस्कृतीनुसार खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात यावेत. 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून 16 जानेवारी 2024 रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात खेळ, कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा एकत्रित अनुभव नाशिकरांना घेता येणार आहे. नाशिकरांनी हा उद्घाटन सोहळा आपण युवाशक्तीच्या सहभागातून अतभूतपूर्व कसा होईल यादृष्टीने तयारी करावायाची आहे. शहरातही राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या दृष्टीने ठिकठिकाणी सजावट, बॅनर, पोस्टर्स, सामाज माध्यमांद्वारे अधिकाधिक प्रसिद्धी करून नागरिकांची या कार्यक्रमाबाबतची उत्सकता वाढवायची आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या भागातील जास्तीत जास्त नागरिकांना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहित करावयाचे आहे. आपण सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम निश्चितच आकर्षक व स्मरणीय होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे