येवला तालुका खरेदी विक्री संघ चेअरमनपदी सालमुठे तर व्हाईस चेअरमनपदी गांगुर्डे बिनविरोध

येवला (प्रतिनिधी) : येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी संजय सालमुठे तर व्हाईस चेअरमनपदी परसराम गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संचालक मंडळ विशेष सभेत चेअरमनपदासाठी सालमुठे तर व्हाईस चेअरमनपदासाठी गांगुर्डे यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अध्यासी अधिकारी सहाय्यक निबंधक (नांदगाव) चंद्रकांत विघ्ने यांनी सालमुठे, गांगुर्डे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, युवानेते संभाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती किसनराव धनगे, प्रवीण गायकवाड, वसंत पवार, रतन बोरणारे, राजेंद्र लोणारी, दिनेश आव्हाड, अरुण काळे, दीपक लोणारी यांच्यासह खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव, सर्व संचालक उपस्थीत होते.