मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतू नमो ग्रामसचिवालय अभियाना अंतर्गत नगरसुल येथे ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करण्यासाठी ५७ लाखांचा निधी मंजूर

येवला (प्रतिनिधी) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नमो ग्रामसचिवालय अभियाना अंतर्गत नगरसुल येथे ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करण्यासाठी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नगरसुल येथे लवकरच सुसज्ज अशी ग्रामसचिवालय इमारत उभी राहून येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळण्यास अधिक मदत होणार आहे.
राज्यात नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत नमो ग्रामसचिवालय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत नगरसुल येथे ग्रामसचिवालय इमारत उभारण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील तीन ग्रामसचिवालय इमारतीस मंजूरी देण्यात आली असून यामध्ये नगरसुल येथील ग्रामसचिवालयाचा समावेश आहे.
या नमो ग्रामसचिवालय अभियान अंतर्गत नगरसुल येथे ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करण्यासाठी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन नगरसुल येथे सुसज्ज असे ग्रामसचिवालय निर्माण होणार होऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.