Breaking
स्थानिक

रामासारखा आदर्श मुलगा कोणी नाही :  ज्ञानेश्वरमहाराज कमोदकर

येवल्यात बाजीराव नगरमध्ये मिरवणूक, भजन कीर्तनासह महाप्रसाद

0 0 9 8 4 4

येवला (प्रतिनिधी) : राम मंदिराचा ५०० वर्षांपूर्वीचा वाद आज संपुष्टात आला, त्यामुळे जगात भारी २२ जानेवारी असेच म्हणावे लागेल. ज्याने सावित्री आईचा शब्द प्रमाण मानला अशा श्रीरामसारखा मुलगा होणार नाही. रामासारखा मित्र, कठोर शत्रू, स्वाभिमानी व्यक्ती, बाप, प्रेमळ कोणी नसून त्यांच्या इतके सख्यत्व कोणी करू शकत नाही. श्रीकृष्ण ऐकावे अन राम अनुभवावे असे श्रीरामाचे महत्व आजही आहे असे प्रतिपादन ज्ञानेश्वरमहाराज कमोदकर यांनी केले.

शहरातील बाजीराव नगरमध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक, भजन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमानी अयोध्येतील श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी कमोदकरमहाराज यांनी श्रीराम कथा सांगताना बोलत होते.  यावेळी गोरक्षनाथ वेलजाळे, बाळू लभडे यांनी उत्कृष्ट गायन केले. बाजीराव नगर परिसरातील घरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या तसेच संपूर्ण परिसराला पताका लावून घरासमोर श्रीरामाच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सायंकाळी बाजीराव नगर मधील हनुमान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत चिमुकल्यांनी बजरंगबली, श्रीराम, लक्ष्मण, सीता, शबरी आदी वेशभूषा करून लक्ष वेधले. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात रामनामाचा जयघोष करण्यात आला. सावरगाव येथील महंत बापूगुरू कुळकर्णी यांच्या वारकरी अध्यात्मिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सुंदर ठेका धरत हरिपाठ व भजने सादर केली. भाविक महिला व पुरुषांनी देखील ठेका धरत यात सहभाग घेतला.

आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन करणारे श्रीराम आदर्श पुत्र होता. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्यानी आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. रावणाच्या मृत्यूनंतर मरणाबरोबर वैर संपते असे सांगणारे श्रीराम आदर्श शत्रूसुद्धा होते. श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात मर्यादापुरुषोत्तम असे म्हटले जात असल्याचे कमोदकर यांनी सांगितले.

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम प्रतिष्ठानचे श्रीहरी जाधव, राजाराममहाराज बिन्नर, घनश्याम सोनवणे, रवी सद्गुले, संतोष गायकवाड, आप्पा सोनवणे, नवनाथ दाणे, अण्णा पवार, चांगदेव काकड, ज्ञानेश्वर गायकवाड, बापूसाहेब जाधव, संतोष विंचू, रमेश मोरे, प्रकाश मोरे, सतिष गायकवाड, सुदर्शन वाघ, विजय आरणे, विजय मस्के, युवराज घनकुटे, आकाश नागरे, अजय पवार, अशोक कुमावत, दत्तात्रय येवले, महेंद्र जाधव, सुमित बगडाने, अमोल महाले, हेमंत भांबारे आदींनी केले.

विठ्ठल रुख्मिनी मंदिर उभारणार

बाजीराव नगर मधील खुल्या जागेत विठ्ठल मंदिर उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येवून मंदिरासाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर लोकवर्गणीतून हे मंदिर उभारण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे