Breaking
महाराष्ट्र

आमचं अस्तित्व संपवणार असाल तर आम्ही लढू : मंत्री छगन भुजबळ

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते संगमनेरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0 0 9 8 4 4

संगमनेर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा कुठलाही विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र ओबीसीमध्ये घुसून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाच अस्तित्व संपणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही लढू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

संगमनेर (जि. अहमदनगर) येथे सकल ओबीसी समाजाच्या संपर्क कार्यालयाचे आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सकल ओबीसी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सरसकट ओबीसी मध्ये समावेश हे कदापिही शक्य नाही.आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही तर वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या मागासवर्गीयांना सामजिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. जो आमच्या अंगावर येईल त्याला आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांना कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का असा सवाल करत नको ना, तर मग सांगा ना असे ते म्हणाले. तेपुढे म्हणाले की, बाळासाहेब सराटे यांनी हाय कोर्ट मध्ये याचीका दाखल केली आहे. ओबीसी मधील तेली, माळी, साळी या सर्व जातींना बाहेर काढण्याचे षडयंत्र केले जात असून यांना बाहेर काढून कुनबीच्या नावाने खोटे ओबीसी घुसवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, देशात ५४ टक्के ओबीसी मागासवर्गीय आहे. त्यांच्या सोबत या देशातील आदिवासी समाज आहे. आमचं अस्तित्व संपवणार असाल तर आम्ही लढू, जशास तसं उत्तर देऊ.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असे सांगत या लढाईत सर्वांनी एकजूट दाखवू या असे आवाहन त्यांनी सकल ओबीसी बांधवांना केले.

ते म्हणाले की, नायगाव आज आम्ही सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांनी दुधाने अभिषेक करून पुतळ्यांचे शुध्दीकरण केले. त्या स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करणाऱ्यांना महात्मा फुले यांचे विचारच समजले नाही आणि विशेष म्हणजे ते ज्या पक्षात काम करता त्या पक्षात स्पृश्य अस्पृश्य भेदभाव होत असेल तर त्यांचे पुढे काय होईल असे सडेतोड उत्तर देत त्यांनी टीका केली.

ते म्हणाले की, मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षण १५ दिवसांत होणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. जर २ दिवसांत आणि १५ दिवसांमध्ये सर्वेक्षण होणार असेल तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातींची जनगणना करुन टाका. आमचे हेच म्हणणे आहे. जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. त्यातून होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे