Breaking
स्थानिक

मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यात एकूण 11 हजार 232 प्रणगक व पर्यवेक्षक करणार सर्वेक्षण

0 0 9 8 4 4

नाशिक  (जिमाका वृत्तसेवा) : राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार 23 ते 31 जानेवारी, 2024 या कालावधीत मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याअनुषंगाने नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांनी विहित मुदतीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मराठा सर्वेक्षण मोबाईल ॲप प्रशिक्षण प्रसंगी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार वैशाली आव्हाड यांच्यासह प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी श्री. दराडे यावेळी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात या सर्वेक्षणासाठी 6 हजार 682 प्रगणक व 454 पर्यवेक्षक अधिकारी जिल्हा प्रशासनामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिक शहर (महानगरपालिका क्षेत्र) मध्ये सर्वेक्षणासाठी 2 हजार 546 प्रगणक व 159 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) साठी 1 हजार 169 प्रगणक व 80 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. तर देवळाली कँटोनमेंट साठी 136 प्रगणक व 6 पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी 23 जानेवारीपासून सुरू होणारी सर्वेक्षण मोहिमेत आपले पूर्ण योगदान द्यावे असे सूचित करून निश्चित केलेली जबाबदारी दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नागरिकही पूर्णपणे सहकार्य करतील असा विश्वास उपजिल्हाधिकारी श्री. दराडे यांनी यावेळी व्यक्त केला.

या सर्वेक्षणात अधिक अचूकता यावी यासाठी सविस्तर प्रश्न नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करून आपली सविस्तर माहिती द्यावी असे आवहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

असे आहेत नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक
नाशिक तालुक्यात या सर्वेक्षणासाठी २५४ (प्रगणक) व १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी ३६९ (२४), कळवण ४४५ (२९), चांदवड ३३५ (२१), त्र्यंबकेश्वर २८३ (२१), दिंडोरी ५६५ (३८), देवळा २९३ (२०), नांदगाव ५६३ (४४), निफाड़ ८४६ (५७), पेठ १०७ (८), बागलाण ७६५ (४९), मालेगाव ६७६ (४५), येवला ५६७ (४२), सिन्नर ४०३ (२७), सुरगाणा २१० (११), कॅन्टोन्मेंट बोर्ड नाशिक १३६ (६) आणि नाशिक (महानगरपालिका क्षेत्र) २५४६ (१५९) व मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) ११६९ (८०) असे एकूण १० हजार ५३३ प्रगणक व ६९९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे