Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळ अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

0 0 9 8 4 5

चंद्रपूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले तर महाराष्ट्राला दुसरे आणि तर हरियाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे या स्पर्धा पार पडल्या.

केरळच्या संघाला 11 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कास्य अशी एकूण 22 पदके मिळाली तसेच 60 वैयक्तिक व 36 रिले मिळून 96 गुण मिळाले. महाराष्ट्राच्या संघाने 9 सुवर्ण, 3 रौप्य व 7 कास्य अशी एकूण 19 पदके जिंकून 53 वैयक्तिक व 36 रिले असे एकूण 69 गुण मिळवले. तर हरयानाच्या संघाने 6 सुवर्ण, 9 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 16 पदकांची कमाई केली. हरयाणाच्यया संघाला 55 वैयक्तिक व 6 रिले असे 61 गुण प्राप्त झाले.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रथमच तालुका स्तरावर राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 34 संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 11 संघांनी 40 सुवर्ण पदकांची कमाई केली तर 19 संघांनी पदकतालिकेत स्थान मिळवले. केरळ, महाराष्ट्र व हरयाणा यांच्यानंतर उत्तरप्रदेश 3 सुवर्ण, 5 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 35 गुण, तामिळनाडू 2 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कास्य पदकासह एकूण 24 गुण, राजस्थान 2 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 20 गुण, छत्तीसगड 2 सुवर्ण व 1 रौप्य पदकासह एकूण 13 गुण, भारतीय शालेय परिषद 2 सुवर्ण व 1 कास्य पदकासह एकूण 11 गुण, मध्य प्रदेश 1 सुवर्ण व 2 रौप्य पदकासह एकूण 11 गुण, झारखंड 1 सुवर्ण व 1 कास्य पदकासह एकूण 6 गुण, लक्षद्विप 1 सुवर्ण पदकासह एकूण 5 गुण, कर्नाटक 6 रौप्य व 5 कास्य पदकासह एकूण 27 गुण, आंध्र प्रदेश 1 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 4 गुण, तसेच केंद्रीय विद्यालय, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व पंजाब यांनी प्रत्येकी 1 रौप्य पदकासह 3 गुण आणि दिल्ली व चंदीगड यांनी प्रत्येकी 1 कास्य पदकासह 1-1 गुण मिळवत पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.

याशिवाय चंदिगड, बिहार, सी.बी.एस.सी. वेलफेअर स्पोर्ट्स, दादरा व नगर हवेली, दव कॉलेज मॅनेजिंग, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, इंटरनॅशनल बोर्ड, आय.पी.एस.सी., जम्मू काश्मिर, नवोदय विद्यालय, ओडिशा, पद्दूचेरी, तेलंगणा व विद्या भारतीच्या संघांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले महाराष्ट्रातील खेळाडू :

100 मीटर तसेच 200 मीटर धावणे जेसन जेम्स कॅस्टिलीनो (महाराष्ट्र), 110 मीटर अडथळ्याची शर्यत संदीप विनोदकुमार (महाराष्ट्र), 400 मीटर अडथळ्याची शर्यत अली समिर शेख (महाराष्ट्र), 6 कि.मी. क्रॉस कंट्री दशरथ तुकाराम (महाराष्ट्र), 110 मीटर अडथळ्याची शर्यत अलिझा आफताब मौला (महाराष्ट्र), थाळी फेक भक्ती तानाजी गावडे (महाराष्ट्र), 4 कि.मी. क्रॉस कंट्री साक्षी भास्कर भंडारी (महाराष्ट्र)

एकापेक्षा अधिक सुवर्ण पदके प्राप्त करणारे खेळाडू :

मोहम्मद मुहास्सीन (केरळ) याने उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये तीन सुवर्ण मिळवले. तसेच जेसन जेम्स कॅस्टिलीनो (महाराष्ट्र), शहारुख खान (उत्तरप्रदेश), सिया अभिजित सावंत (भारतीय शालेय परिषद), सोनिका राजवाडे (छत्तीसगड) यांनी देखील प्रत्येकी दोन सुवर्ण पदके प्राप्त करत आपला ठसा उमटविला.

मुलांच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू :

400 मीटर धावणे अभिराम पी. (केरळ), 800 मीटर व 1500 मीटर धावणे शहारुख खान (उत्तरप्रदेश), 3000 मीटर धावणे बलजीत सिंग (हरयाणा), उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीत मोहम्मद मुहास्सीन (केरळ), बांबू उडी कवीन राजा एस. (तामिळनाडू), गोळा फेक निखलेश (हरयाणा), थाळी फेक तनिष्क शेवरन (हरयाणा), हॅमर थ्रो नरपत सिंह (राजस्थान), भाला फेक आदित्य (हरयाणा), 4X100 रिले (महाराष्ट्र), 4X400 रिले (केरळ), 5000 मीटर चालण्याची शर्यत सचिन (हरयाणा),

मुलींच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू :

100 मीटर आणि 200 मीटर धावणे सिया अभिजित सावंत (भारतीय शालेय परिषद), 400 मीटर धावणे आणि 400 मीटर अडथळ्याची शर्यत ज्योथीका एम. (केरळ), 800 मीटर धावणे आशा किरण बरला (झारखंड), 1500 मीटर आणि 3000 मीटर धावणे सोनिका राजवाडे (छत्तीसगड), उंच उडी ॲलिस देवा प्रसन्ना एस (तामिळनाडू), बांबू उडी तनु यादव (मध्य प्रदेश), लांब उडी मुबासिना मोहम्मद (लक्षद्विप), तिहेरी उडी जेनिस ट्रीसा रेगी (केरळ), गोळा फेक अनुप्रिया (केरळ), हॅमर थ्रो अनुष्का यादव (उत्तर प्रदेश), भाला फेक वर्षा (हरयाणा), 4X100 रिले आणि 4X400 रिले दोन्ही स्पर्धेत केरळ, 3000 मीटर चालण्याची शर्यत खुशबू यादव (राजस्थान).

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे