Breaking
स्थानिक

चांदवड लासलगांव विंचुर सावळी विlहीर रस्ता रामा-७ रस्त्यावर लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्गाचे बांधकामाचा प्रस्ताव तातडीने व्यय अग्रक्रम समिती बैठकीत आणावा :  उपमुख्यमंत्री अजित पवार

लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्ग कामाला लवकर सुप्रमा देऊन हे काम पूर्ण करा : मंत्री छगन भुजबळ

0 0 9 8 4 7

मुंबई (प्रतिनिधी) : चांदवड लासलगांव विंचुर सावळी विहीर रस्ता रामा-७ रस्त्यावर लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्गाच्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने व्यय अग्रक्रम समिती बैठकीत आणावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठकीत दिल्या.

चांदवड लासलगांव विंचुर सावळी विहीर रस्ता रामा-७ रस्त्यावर लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्गाच्या कामाबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव साळुंके, उपअभियंता घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, संकेत चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, नंदकुमार पाटील, गोकुळ होळकर, संदीप शिरसाठ, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगांव गावाजवळ रेल्वे उड्डाणपुल व पोहच मार्ग कामाला लवकर सुप्रमा देऊन हे काम पूर्ण करण्यात यावी अशा सूचना केल्या. ते यावेळी म्हणाले की, चांदवड लासलगांव विंचुर सावळी विहीर रामा ७ या रस्त्यावर लासलगांव येथे आशिया खंडातील काद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. राज्यमार्ग क्र. ७ हा रस्ता लासलगांव शहरातून जात असल्यामुळे या रस्त्यावर शेतीमालाची तसेच अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतुक वर्दळ आहे. या रस्त्यावर सा.क्र. १९२/५०० मध्ये मुंबई भुसावळ या मार्गावर रेल्वेगेट (क्र. १०५) आहे. या मार्गावर रेल्वेची मोठ्या प्रमाणात वाहतुक असल्यामुळे (TVU ३८०५१५ ) या राज्यमार्गावरील वाहतुकीस रेल्वे गेटमुळे अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची सतत कोंडी होत असते. त्यामुळे लासलगाव वळण रस्ता व उड्डाणपुलाचे बांधकाम लासलगाव शहराच्या वाढत्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक होते असे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.६९,७६,००,०००/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली होती. या निधीमधून सन २०२२ मध्ये रेल्वे उड्डाणपूल व पोहोच मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन बाकी असल्यामुळे उड्डाणपूल पूर्ण होवूनही या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरु झालेली नाही असे निदर्शनास आणून दिले.

तसेच सदर बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रीया प्रगतीत आहे. जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेल्या दराची परिगणना करुनउपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग, निफाड यांनी त्यांचे पत्र क्र. भुसं/कावि/१६१/२०२२,दि. १६ मार्च २०२२ अन्वये एकुण रु.३१.३६ कोटी इतकी रक्कम भूसंपादनासाठी कळविण्यात आलेली आहे. तसेच कामाची भाववाढ, Royalty and Testing Charges व इतर अनुषंगीक बाबीची वाढ झाल्याने प्रशासकीय मान्यतेमध्ये या रकमेची तरतुद नसल्याने मुख्य अभियंता यांनी सुधारीत प्रशासकीय मान्यतेस्तव रक्कम रु.१०९.६९ कोटीचे अंदाजपत्रक जसादर केलेले होते.त्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या.या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव व्यय अग्रक्रम समिती बैठकीत आणावा अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे