मातोश्री पॉलिटेक्निकचा खो-खो संघ जिल्हास्तरावर विजयी
कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

येवला (प्रतिनिधी) : राज्य इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन ई २ विभाग अंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत मातोश्री पॉलिटेक्निक धानोरे येथील संघ खो-खो स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी ठरला.
सलग तीन वर्ष महाविद्याने खो-खो सामन्यात प्रथम येण्याचा मान पटकवला. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ५ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन संघाला नमवत मातोश्री पॉलिटेक्निकचा संघ विजयी ठरला. विजेत्या संघातील रामजी बुधर, विवेक गावित, सचिन चौधरी, कुणाल साठे, सतीश कुरकुटे, कलपेश गडक, अजय महाले, सिधार्थ लहानगे, सचिन राडे, ऋतिक भदाने, अमीर मोहनकर, माधव चौधरी या विद्यार्थ्यांनी अंतिम सामन्यात धडक मारत जोरदार कामगिरी केली. त्यांना मागविद्यालायातील प्रा. अक्षय झाल्टे व प्रा. अक्षय पेंढारी यांचे मार्गदर्शन लाभले. भावी अभियंत्यांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळविला आहे. हे विद्यार्थी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारतील असा विश्वास संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांनी व्यक्त केला.
सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार किशोर दराडे, सचिव कुणाल दराडे यांनी अभिनंदन केले. तर संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांनी सत्कार केला. याप्रसंगी माहाविद्यालयाचे प्राचार्य गितेश गुजराथी, विभागप्रमुख बाळासाहेब तांबे, नितीन गुजर, महेश घोरपडे, मनोज वाघ, योगेश खैरनार आदी उपस्थित होते.