क्रिडा व मनोरंजनस्थानिक
येवला येथील खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

0
0
9
8
5
8
येवला (प्रतिनिधी) : कोपरगाव येथे झालेल्या १३व्या ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत येवला येथील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धेत राज्यातून दहा संघामधून २०८ खेळाडू सहभागी झाले होते. यात तनुजा शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा संघ सहभागी झाला होता. त्यात येवला येथील स्वराक्षी दाभाडे, तपस्या भिलारे, शर्वरी भागवत, सुरभी कोकणे, अनया गुलमर, आर्वी काबरा, कस्तुरी धर्माळे, या विद्यार्थिनींनी कराटे फाईट ( कुमिते ) व काता या प्रकारात गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळवत यश संपादन केले. तसेच त्यांची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी खेळाडूंचे शोतोकॉन कराटेचे राज्यस्तरीय अध्यक्ष सुदर्शन पांढरे, सरचिटणीस स्नेहल पांढरे, प्रशिक्षिका तनुजा शिलेदार यांनी अभिनंदन केले आहे.
0
0
9
8
5
8