विश्वलता महाविद्यालयात वाणिज्य सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

येवला (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आणि नॅक मूल्यांकन प्राप्त श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव येथे वाणिज्य विभागांतर्गत आयोजित तीन दिवसीय कॉमर्स सप्ताह 2023-24 मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सप्ताहात प्रश्न मंजुषा, पोस्टर प्रेझेंटेशन, वादविवाद, पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, पोएट्री कॉम्पेटिशन, ऍड मॅड शो, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट अशा विविध विषयांवर स्पर्धा आणि अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. कॉमर्स सप्ताहाची सुरुवात बिझनेस क्विझ अर्थात व्यावसायिक प्रश्न मंजुषा या स्पर्धेने करण्यात आली तसेच दुसर्या सत्रात अर्थसंकल्प व वाणिज्य क्षेत्रातील विविध संकल्पना आणि वाणिज्य क्षेत्रातील व्यावसायाच्या संधी यावर आधारित जनजागृतीपर पोस्टर तयार करण्यात आले आणि त्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आणि विद्यार्थ्यांनी अंतरिम अर्थसंकल्पाबाबत आपले स्व मत वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केले.
दुसर्या दिवशी पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, पोएट्री कॉम्पेटिशन, ऍड मॅड शो, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
तिसर्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात मार्गदर्शक म्हणून येवला कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील अर्थशास्त्राचे प्रा. पंढरीनाथ दिसागज हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. ज्ञानदेव कदम हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रा. दिसागज यांनी, अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी बाबत सखोल मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पात शेती क्षेत्र, पायाभूत सुविधा, महिला, रोजगार, आवास योजना, आरोग्य आणि आयकर या महत्त्वाच्या मुद्यावर करण्यात आलेल्या तरतूदींची सविस्तर माहिती दिली. तर अर्थसंकल्पातील तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम विविध उदाहरणांच्या सहाय्याने सोप्या भाषेत समजावून सांगितला. अध्यक्षीय भाषणात प्रा. कदम यांनी, कॉमर्स सप्ताहामध्ये घेतलेल्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी साठी नवी दिशा मिळेल, असे सांगून आगामी काळात वाणिज्य शाखेतून निर्माण होणार्या व्यावसायिक संधी कडे सकारात्मक विचार करून संधीचे सोने करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. आण्णासाहेब पवार यांनी यावेळी बोलतांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बिसिनेस क्विझ, पोस्टर प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन, वादविवाद, पोएट्री कॉम्पेटिशन, ऍड मॅड शो, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट अशा विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. अक्षय बळे यांनी केले तर आभार प्रा. प्रतिभा कोटमे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. किरण ढमाले, प्रा. अमोल मोरे, प्रा. अजित खैरनार, प्रा. प्रवीण घोडेराव, प्रा. चांगदेव सोनवणे, प्रा. पायल पांडे, प्रा. प्रतिभा कोटमे, प्रा. आम्रपाली आहिरे, प्रा. वर्षा जाधव, प्रा. गीता बोराडे, कु. रुपाली कोल्हे, कु. आरती मगर, कु. आरती गोरे, कु. दर्शनी दाभाडे, कु. वैष्णवी जाधव, कु. पूजा काटे, कु. विद्या चव्हाण, कु. भाग्यश्री गागरे, कु. पूनम जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले.