आरोग्य व शिक्षणस्थानिक
येवला व्यापारी महासंघ व चंडालिया परिवारातर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

0
0
9
8
4
5
येवला (प्रतिनिधी) : स्व. उत्तमभाऊ चंडालिया यांचे स्मरणार्थ विजय चंडालिया व येवला व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भगतवाडी (अनकाई ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
स्वर्गीय उत्तमभाऊ चंडालीया यांच्या स्मरणार्थ चंडालिया परिवार तसेच येवला व्यापारी महासंघ हे दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. यावर्षी तालुक्यातील भगतवाडी (अनकाई) या जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. याप्रसंगी विजय चंडालिया, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, शिक्षक चव्हाण, देवकर उपस्थित होते.
0
0
9
8
4
5