माता जगदंबा जेष्ठ नागरिक महिला संघा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

येवला (प्रतिनिधी) : येथील माता जगदंबा जेष्ठ नागरिक महिला संघ यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील जनता विद्यालय शाळेतील आदिवासी सेवा संचलित मुलींच्या वसतिगृहातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप अध्यक्ष सौ. कुसुम कलंत्री, सचिव श्रीमती सुवर्णा चव्हाण, कोषाध्यक्ष श्रीमती निर्मला कुलकर्णी यांचे हस्ते करणेत आले.
या वसतिगृहात 30 विदयार्थीनी शिक्षण घेत असून या विद्यार्थिनींशी संवाद साधून महिला दिनाचा इतिहास सांगण्यात आला. स्त्री पुरुष समतेसाठी आतापर्यन्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची केलेली सुरुवात आणि त्यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी मिळवून दिलेल्या आरक्षणची माहिती श्रीमती चव्हाण यांनी दिली.
सौ. कलंत्री यांनी, आपल्या संस्कृती विषयी माहिती देऊन स्त्रीया कुटुंबातील प्रमुख भूमिका बजावून मुलीवर चांगले संस्कार करून स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करू शकतात यात शिक्षित मुली महत्वाची भूमिका बजावत आहे असे प्रतिपादन केले.
श्रीमता कुलकर्णी यांनी, मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करून समते च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलींनी त्यांच्या करिअर बरोबरच कुटुंबातील मुलांवर पालकांनी योग्य संस्कार करून समताधिष्ठित समाज निर्माण करणेसाठी आवश्यक भूमिका बजवावी असे सांगतले. याप्रसंगी वसतिगृहाच्या अधिक्षिका सौ. रेखा पाटील, श्रीमती कचवे उपस्थित होत्या त्यांनीही मार्गदर्शन केले.