वारसा जपत सांस्कृतिक, अध्यात्मिक वैभव प्राप्त करा : ब्रह्माकुमारी नीतादीदी
एस.एन.डी. महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

येवला (प्रतिनिधी) : आईसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेऊन आपले ध्येय साध्य करून यशस्वी व्हा!,संत जनाबाई, संत मुक्ताबाई,जगदंबा यांच्या अध्यात्मिक जीवनाचा अभ्यास करून आपल्या जीवनात सांस्कृतिक,अध्यात्मिक वैभव प्राप्त करा. सगळ्यांचा सन्मान ठेवून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करा.आपला देश, समाज यासाठी तुम्हीच आधार आहात, असा अनमोल संदेश ब्रह्माकुमारी नीतादीदी यांनी दिला.
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन.डी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी नीता दीदी बोलत होत्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धार्थ रणयेवले कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी नीता दीदी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत महिला सबलीकरनावर मार्गदर्शन केले. श्रीमती सुखदा देवगावकर यांनी कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे आवाहन केले. प्रा. संदीप ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्त्री पुरुष समानता याविषयी महत्व पटवून दिले. विद्यार्थिनी तेजल पाटील हिने जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो व कधीपासून साजरा केला जातो हे सांगून महिला दिवसाचे महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य डॉ. सिद्धार्थ रणयेवले यांनी स्त्री पुरुष समानताचे महत्व आणि उद्देश विद्यार्थ्यांना सांगितले. मुलींनी प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वास पूर्वक सामोरे गेले पाहिजे. मुलींना आता प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्वल करण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन प्रा. साक्षी आहेर व प्रा. अंकिता दिवटे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. शितल घोडेराव यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. मोनाली वाबळे यांनी, आभार प्रा. ज्योती वैराळ यांनी केले.
कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विशाल निंबोळकर, बी.ए. विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र थोरात, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गणपत धनगे, बी.एस्सी विभाग प्रमुख प्रा. योगेश शिंदे तसेच प्रा. हंसा बागरे, प्रा. प्रियंका बनकर, प्रा. चैताली वाघ , प्रा. यशश्री पवार , प्रा. अश्विनी मोरे , प्रा. प्राजक्ता पवार, प्रा. मनीषा पंडित, प्रा. माधुरी दहे, प्रा. संजना पैठणकर आदी उपस्थित होते.