राजापूर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राजापूर (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील राजापुर येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विजय सानप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाचे श्रीराम दराडे, प्राचार्य राजू पठाण, पर्यवेक्षक देविदास थोरे, माजी प्राचार्य पि. के. आव्हाड, ज्ञानेश्वर दराडे, पोपट आव्हाड, सुभाष वाघ, दत्ता सानप, पालक शिक्षक संघाचे सदस्य अनिल अलगट, शांताराम अलगट, शंकरराव अलगट, सुदाम वाघ, भारत वाघ, शरद वाघ, नवनाथ वाघ, विजय विंचू , वसंत नागरे, हनुमान घुगे, नंदू बोडखे, सोमनाथ राखे, सखाहारी अलगट, रविंद्र अलगट, जगन अलगट, नवनाथ विंचू, उच्च माध्यमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख बापू दराडे हे होते.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे व प्रविण वाघ यांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. विद्यार्थींना वेशभूषा साठी वर्षा भोगे, पुजा गायकवाड, आरती बूरकुल, दिपाली लोखंडे, माया वाघ, संतोष गिते यांनी सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी जीवनमान, वासुदेव, देशसेवा, पाटलांचा बैलगाडा आदी गीतांनी धमाल उडवून दिली. मेली माझी सख्खी बायको मेली, या गीतातील मयूर अलगट, कमलेश सोनवणे यांच्या अभिनयाने उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. राजेंद्र आव्हाड व गंगाधर कांगणे यांनी गीत बसविले होते. सुभाष वाघ, बाळू अलगट यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बक्षिसे दिली. गणपती बाप्पा पुजन, भगवा रंग, चला जेजूरीला जाऊ या गण्यानाही दाद मिळाली.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजेंद्र आव्हाड व राजेंद्र वाघ, देविदास थोरे यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजु पठाण व अनिल कोतकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.