Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रस्थानिक

आगामी २०२७-२८ च्या सिंहस्थाच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांकडून पंचवटी परिसरात पाहणी

0 0 9 8 4 7

नाशिक (प्रतिनिधी) : आगामी सिहस्थ लक्षात घेता मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, अधिक्षक अभियंता, विभाग प्रमुख, अधिकारी यांनी सिंहस्थ कामांमध्ये कोण कोणती कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे आणि कोणती कामे हाती घेणे अतिआवश्यक आहे यादृष्टीने पाहणी केली.

नाशिक मनपाने तयार केलेल्या सिंहस्थ कृती आराखड्याच्या कामांचे अनुषंगाने आयुक्तनी संयुक्त पाहणीस रामकुंड पासून सुरुवात केली. एकमुखी दत्तमंदिर जवळ होळकर पुलाच्या डाव्या बाजुच्या पाय-याच्या अनुषंगाने तशाच पाय-या पंचवटीच्या बाजुने करता येतील का तसेच गांधी ज्योत नुतनीकरण, गांधी तलाव परिसरात पाणी भरल्यानंतर अल्हाद दायक वातावरण राहील यादृष्टीने नाविन्यपुर्ण उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सुचना दिल्या. रामकुंड व लक्ष्मणकुंड येथील सांडवा आणि इतर सांडवे यांची आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने स्ट्रक्चरल स्टॅबिलिटची तपासून सिंहस्थाच्या यादृष्टीने मजबुतीकरण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणे बाबत सुचना दिल्या. नदीकाठावरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नुतनीकरण करण्याच्या सुचना दिल्या. गोदावरी नदी वरील देवी मंदिरासमोरील मनपा मालकीची इमारत आगामी सिंहस्थाच्यादृष्टीने उपायोगात आणता येईल का याबाबच सुचना दिल्या. आगामी सिंहस्थ शाही मिरवणुका व रामरथ, गरुडरथ, गाडगे महाराज पुलाखालून येतांना पुलाच्या उंचीमुळे मिरवणुकीस मर्यादा येतात. त्यामुळे पुलाखाली खड्डा ठेवावा लागतो. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होते. पुलाचे मजबुतीकरण व नुतनीकरण, पुलावरून एक रॅम्प उतरवता येऊ शकेल काय याबाबत सुचना दिल्या.

नदीपात्रात होणारी पार्किंग तसेच सिंहस्थ कालावधीत होणारी संभाव्य वाहनांची गर्दी लक्षात घेता गणेशवाडी येथे अमरधाम समोरील पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा मनपाच्या ताब्यात घेण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करणेस सांगितले. पारंपारिक शाहीमार्गाची पाहणी करून २००३ साली झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणांची आयु्क्तनी पाहणी करून सन २०१७ च्या मंजुर आराखड्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विकास् योजना रस्ता याचे विकसन करण्यासाठी संपादित करावयाच्या मिळकतींची माहिती तयार करण्याच्या सुचना दिल्या. नाशिक शहरासाठी काळाराम मंदिराचे पौराणिक महत्व लक्षात घेता तसेच साधुमहंत यांचा काळाराम मंदिराशी असलेला जिव्हाळा लक्षात घेता मंदिराच्या सभोवताली कायमस्वरुपी चांगल्या प्रकारचे विकसन होणेसाठी अभ्यास करणे बाबत सुचना दिल्या.

टाळकुटेश्वर पुला लगत नवीन पुल बांधणेच्यादृष्टीने संपादित कराव्या लागणा-या क्षेत्राची माहिती घेण्याबाबत सुचना दिल्या. नवीन भाजीमार्केट येथे सिंहस्थाच्या दृष्टीने सर्व विभागांसाठी संयुक्तरित्या सिंहस्थ सुविधा केंद्र उभारणेसाठी त्यावर एक मजला बांधण्याच्या सुचना दिल्या. जुने गणेशवाडी पंपिंग स्टेशन येथे अग्निशमन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी केली. तपोवन येथे लक्ष्मी नायारण मंदिरात साधुग्रामचे महत्व लक्षातघेता नवीन प्रस्तावित करणेत आलेला पुल नदीपात्रातील घाटांचे नुतनीकरण व नवीन घाट बांधणेसाठीची जागा यांची पाहणी केली. तपोवनातील सिंहस्थ साठीच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून त्याची क्षमता वाढविणेच्या दृष्टीने त्यावर एक किंवा दोन मजले बांधणेसाठीची शक्यता पडताळून बघणेच्या सुचना दिल्या. साधुग्राम येथील उभारणेत आलेल्या कमानीचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणे आदी बाबींचा समावेश करणेच्या सुचना दिल्या. बटुक हनुमान मंदिर परिसरात अनाधिकृतपणे बांधणेत आलेला श्री शनैश्वर मंदिर गाईचा गोठा तसेच बटुकेश्वर मंदिरालगत झालेले अनाधिकृत बांधकाम व नाशिक मनपाच्या संपादित जागेत होत असलले अतिक्रमण हटविणेच्या सुचना दिल्या.

कपिला-गोदावरी संगम येथे पलिकडच्या तिरावर जाण्यासाठी लक्ष्मण झुला पुलाच्या जागेची पाहणी केली, त्याच समवेत भुयारी गटार योजनेची कामे, पाणी पुरवठा विषयक कामे, साधुग्रामला होणारा पाणी पुरवठा, विद्युत विषयक कामे नाशिक मनपाच्या तपोवन येथील बस डेपोची जागा व रस्त्याची पाहणी यावेळी केली. तपोवन येथील मनपाचे मलशुध्दीकरण केंद्र येथे पाहणी करून त्या संबंधीची माहिती आयुक्त यांनी घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे