Breaking
कृषीवार्तास्थानिक

येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम पूर्ण करा : मंत्री छगन भुजबळ

मंत्री भुजबळ यांच्याकडून दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी

0 0 9 8 4 4

येवला (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील सिंचन वाढून दुष्काळ दूर होण्याच्या दृष्टीने मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या कामाला सुरुवात झाली आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी अंगुलगांव, न्याहारखेडे खु., नगरसुल येथे दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण कामात एकूण ६३ किमीसाठी ९६ कोटी इतक्या निधीची तरतूद आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव एकूण ८७ किमी अंतर विस्तारीकरण, अस्तरीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एचपीडी सुविधा, नदीवरील पूल, कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट, आदी कामांचा समावेश आहे. या कामास सुरुवात करण्यात आली असून ३७ किमी ते ६३ किमी येथे मशीनने कालवा लेव्हल काम सुरू आहे. या कामासाठी कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्टचे काम सुरू आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी च्या कामात विस्तारीकरण,काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुल, बाळापुर ,सावखेडे, कुसमडी, नगरसुल, न्याहारखेडे, अंगुलगाव, तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल, कुसुर, हडपसावरगाव, वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, वाईबोथी व न्याहारखेडे येथील नदीवरील ये जा करण्यासाठीचे मोठे २ पुल, बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतलेले आहेत. या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

या कालव्याचे सात ठिकाणी एकाच वेळी काम सुरू आहे. या सातही ठिकाणी काँक्रिट प्लांट उभारण्यात आले आहे. तसेच यासाठी २२ एक्सव्हेटर व दहा पेव्हर मशीनसह सुमारे ७०० लेबर काम करत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्या पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे