येवल्यात मकर संक्रांत निमित्ताने धडपड मंचच्या वतीने मेहंदी स्पर्धा संपन्न

येवला (प्रतिनिधी) : मकर संक्रांत निमित्ताने येथील धडपड मंचच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावी म्हणुन प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही महिलांसाठी मेहंदी रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुवर्णा झळके ह्या उपस्थित होत्या.
येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात घेण्यांत आलेल्या या स्पर्धेकरीता १८ वर्षाच्या आतील व १८ वर्षाच्या वरील असे दोन गट करण्यांत आले होते. एकुण ८० स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता. सर्व सहभागी स्पर्धकांना धडपड मंचच्या वतीने भेटवस्तु देण्यांत आली.
सहभागी स्पर्धकांना एक तासाचा मेहंदी रेखाटनासाठी अवधी देण्यात आला होता. त्यात स्पर्धकांनी अतिशय सुंदर मेहंदीचे रेखाटन केलेले पाहुन यात परिक्षकांची परिक्षा ठरली. परिक्षणाअंती दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धक निवडण्यात आल्या. १८ वर्षाचे वरील गटातील सिद्धी शर्मा, पूजा पवार, दिपाली सोनवणे, बुशरा अन्सारी, रिना घोडके, वैष्णवी शर्मा, पूजा माळोकर, मिताली टाक, शुभांगी माचेवाल तसेच १८ वर्षाचे आतील गटातील याशिका शर्मा, प्रांजल बनछोड, श्रुती भावसार, धनश्री पोकळे, मानसी नागपुरे, पूर्वा सोरते, संस्कृती सूर्यवंशी, तन्वी नाकील, दीप्ती जाधव ह्या स्पर्धक विजेत्या ठरल्या.
दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांपैकी प्रथम दोन विजेत्यास सेमी पैठणी तर इतर सात विजेत्यांना वस्तुरुपात भेटवस्तू देण्यात आली. दरम्यान किंजल पटेल व सुरभी पटेल या चिमुरड्या मुलींनी रेखाटलेल्या मेहंदीस विशेष बक्षीस देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीता पटेल, शैला कलंत्री, राजश्री पहिलवान, माया टोणपे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व आभार धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी मानले.
उपक्रम यशस्वीतेसाठी नारायण शिंदे, दत्तात्रय नागडेकर, मुकेश लचके, संतोष खंदारे, रमाकांत खंदारे, श्रीकांत खंदारे, प्रशांत सोनवणे, सुभाष निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.