स्थानिक
येवला मर्चन्टस् बँक चेअरमनपदी श्रीमती सोनल पटणी, व्हाईस चेअरमनपदी श्री. चंद्रकांत कासार
जनसंपर्क संचालकपदी श्री. सुभाष गांगुर्डे

0
0
9
8
4
7
येवला (प्रतिनिधी) : येथील दि येवला मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी श्रीमती सोनल जगदिश पटणी, व्हाईस चेअरमनपदी श्री. चंद्रकांत बापुशेठ कासार व जनसंपर्क संचालक म्हणुन श्री. सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बँक सभागृहात सहाय्यक निबंधक श्री. एस. बी. कासार यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. सदर सभेत चेअरमन पदासाठी श्रीमती सोनल पटणी व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. चंद्रकांत कासार यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक श्री. कासार यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
याप्रसंगी बँकेचे संचालक बालुशेठ परदेशी, श्री. सुहास भांबारे, श्री. प्रज्वल पटेल, सौ. पुजा काबरा, डॉ. महेश्वर तगारे, श्री. महेश भांडगे, सौ. छाया देसाई, सौ. सोनल राजपुत, सौ. सारीका दिवटे, श्री. बाबासाहेब देशमुख तसेच पॅनल प्रमुख श्री. मनिष काबरा, श्री. राजेश भांडगे, श्री. सुरज पटणी तसेच माजी संचालक श्री. मनोज दिवटे, श्री. निरंजन परदेशी, ॲड. जुगलकिशोर कलंत्री, पटणी समाज अध्यक्ष श्री. विलास पटणी, श्री. कृष्णा कंदलकर आदींसह व्यापारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
दि येवला मर्चन्टस् को-ऑप. बँकेची स्थापना १९४४ साली झाली असुन उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त सोनेतारण कर्ज वाटप करणारी अग्रगण्य बँक म्हणुन बँकेची पंचक्रोशीत ओळख आहे. आज बँक प्रगती पथावर असून बँकेने वेळोवेळी येथील विणकर बांधवांना अडचणीच्या कालखंडात मोलाचे अर्थसहाय्य दिले आहेत. बँक सामाजीक कार्यातही अग्रेसर असते. तर ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळया योजना बँकेने राबविल्या आहेत.
0
0
9
8
4
7