महाराष्ट्रराजकिय
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी मयूर मेघराज

0
0
9
8
4
7
मुंबई (प्रतिनिधी) : दादर येथे झालेल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संयुक्त मोर्चा बैठकीत येवला येथील मयूर मेघराज यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्या हस्ते मेघराज यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या २४ व्या वर्षी मेघराज यांच्यावर पार्टीने खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. मेघराज यांच्याकडे याआधी भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ही जबाबदारी होती. त्या कार्यकाळात त्यांनी विणकारांच्या समस्यांसाठी मंत्रालयात देखील मंत्री महोदयांच्या दालनात बैठक लावली होती. संघटना व पक्ष कार्यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. पक्षात काम करत असताना पक्षाविषयी एकनिष्ठता, विविध आंदोलने, आरोग्य शिबिरे व सामाजिक कार्याची दखल घेत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व पक्षश्रेष्ठींनी मेघराज यांना ही जबाबदारी दिली आहे. मेघराज यांनी याआधी भाजपा विद्यार्थी आघाडीतही काम केले आहे. तर भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अशी पदे भूषवली आहे.
मेघराज यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, आमदार गोपीचंद पडळकर, महामंत्री विजय चौधरी, संघटनमंत्री रवींद्र आनसपुरे,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री योगेश मैंद, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, उपाध्यक्ष प्रमोद सस्कर , वि. प्र. राज्य संयोजक मनोज दिवटे, तरंग गुजराथी आदींनी अभिनंदन केले आहे.
पक्षाने व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व पक्षश्रेष्ठींनी ज्या विश्वासाने अतिशय मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली असून प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेल अशी ग्वाही देतो.– मयुर मेघराजप्रदेश सदस्य, भाजयुमो महाराष्ट्र
0
0
9
8
4
7