
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तू गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपसरपंच इंदुबाई पैठणकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत दत्तू श्रावण गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निवडणूक अधिकारी कदम यांनी गायकवाड यांची बिनविरोध निवड घोषित केली.
सभेस सरपंच सुरेखा तुकाराम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई नारायण पैठणकर, विमल रावसाहेब गायकवाड, लता दिपक गायकवाड, गोपाळ वसंत गायकवाड, अनिल अहिरे, दीपक इंगळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीप मेंगळ, बापु गायकवाड, दगु गायकवाड, नारायण गायकवाड, साहेबराव निकम, दीपक गायकवाड, मनोहर गायकवाड, तुकाराम गायकवाड, संग्राम मेंगळ, नाना औताडे, अनिल गायकवाड, बाळू औटे, विष्णू गायकवाड, इंगळे गुरुजी, गोरख गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.