बाल रुपातील रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो सोशल माध्यमात होतोय व्हायरल
अयोध्यातील सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

अयोध्या : देशवासीयांना प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन येत्या २२ जानेवारी रोजी होत आहे. या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील दिग्गजांना, नेत्यांना, कलाकार, खेळाडू आणि साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रीत केल आहे.
दि. १८ जानेवारी रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली. या मूर्तीचा पहिला फोटो सोशल माध्यमातून समोर आला आहे. मंदिरात रामलल्ला म्हणजेच बाल रुपातील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून सदर मूर्ती घडवली आहे.
श्रीरामाची ही मूर्ती खूप आकर्षक आहे. मधुर हास्य, कपाळावर टिळा, हातात सोन्याचा धनुष्यबाण असलेल्या रामाच लोभस रूप या मूर्तीत पाहायला मिळाल आहे. मूर्तीचा हा फोटो सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सावळ्या रंगाची ही मूर्ती रामाचं बालरुप आहे. ५१ इंच उच असणाऱ्या या मूर्तीचं वजन २०० किलो असून गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवली जाणार आहे. दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल, जो दुपारी १ वाजपेर्यंत चालेल.