सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीत अनंत कान्हेरे यांचे बलिदान नवीन पिढीने लक्षात ठेवावे : हेमंत टिळे
डाॅ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

येवला (प्रतिनिधी) : हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी केलेल्या जॅक्सनच्या खुनाची पार्श्वभूमी व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीकारकांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, अभिनव भारत संघटना व हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे बलिदान आजच्या पिढीने कायम स्मरणात ठेवावे. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना ही काव्यपंक्ती समजून घ्यावी. सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा समजून घ्यावी. स्वतःच्या घरादाराचा, जीवनाचा त्याग करून ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसत हसत फाशीवर जाणा-या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे हा देश स्वतंत्र झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. हेमंत टिळे यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल विभागाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ‘हुतात्मा अनंत कान्हेरे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. टिळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. भाऊसाहेब गमे हे होते. यावेळी बोलताना प्रा. हेमंत टिळे यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी केलेल्या जॅक्सनच्या खुनाची पार्श्वभूमी व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीकारकांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, अभिनव भारत संघटना व हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे बलिदान आजच्या पिढीने कायम स्मरणात ठेवावे. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना ही काव्यपंक्ती समजून घ्यावी. सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा समजून घ्यावी. स्वतःच्या घरादाराचा, जीवनाचा त्याग करून ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसत हसत फाशीवर जाणा-या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे हा देश स्वतंत्र झाला आहे. या देशात जर कोणी वन्दे मातरम् ला विरोध करत असतील तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असेही टिळे म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ. गमे यांनी, येवला महाविद्यालयाने काढलेल्या ‘उन्मेष’ च्या येवला तालुका स्वातंत्र्य चळवळ विशेषांकाविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य चळवळीत नाशिक हे नाव देशाच्या केंद्रस्थानी होते. क्रांतिकारकांनी आपल्याला दिलेले स्वातंत्र्य टिकविणे, देशाला सुदृढ लोकशाही सुशासन देणे, देशकार्यासाठी सदैव कर्तव्य तत्पर असणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक बहिःशाल केंद्र कार्यवाह डाॅ. धनराज धनगर यांनी केले. त्यांनी बहिःशाल व्याख्यानमालेची पार्श्वभूमी व महत्त्व विशद केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डाॅ. रघुनाथ वाकळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. नाना घुगे यांनी केले तर आभार प्रा. समाधान कदम यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. रविंद्र ठाकरे, प्रा. कैलास चौधरी, प्रा. बी.एल. शेलार आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद जाधव व सोमनाथ कुवर यांनी परिश्रम घेतले.