जागतिक महिला दिनानिमित्त येवला व्यापारी महासंघातर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

येवला (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त येवला व्यापारी महासंघातर्फे व्यापारी बांधवाला त्यांच्या व्यवसायामध्ये सहकार्य करणाऱ्या माता व पत्नी तसेच यशस्वी व्यावसायिक महीलांचा सत्कार करण्यात आला.
व्यापारी महासंघातर्फे सौ. कीर्ती सोनवणे, सौ. शितल सोनवणे, सौ. नीलिमा सोनवणे, श्रीमती पुष्पा सोनवणे, सुषमाताई पैठणकर, श्रीमती सुषमाभाभी गुजराथी, सौ. आदिती कोकणे, सौ. सरिता आहेर, सौ. संगीताभाभी पटेल, सौ. चंद्रकलाबाई धारक, सौ. सपना धारक, सौ. जयश्री धारक या कर्तबगार महिलांचा सत्कार त्यांचे घरी जाऊन करण्यात आला.
सर्व क्षेत्रांमध्ये महिला भरारी घेत आहे. व्यापारातही महिला पाठीमागे नाही. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला व्यवसायामध्ये सध्या कार्यरत आहेत. इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळावे म्हणून व्यापारी महासंघातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, उपाध्यक्ष रितेश बुब तसेच मार्गदर्शक विजुभाऊ चंडालिया हे उपस्थित होते.